उदयपूर हत्या प्रकरण: आरोपींचे भाजप कनेक्शन उघड

राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल नावाच्या एका टेलरचा नुपूर शर्मा हीचे समर्थन केल्याप्रकरणी खून करण्यात आला होता.
Udaipur Case
Udaipur CaseSakal
Updated on

Udaipur: राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल नावाच्या एका टेलरचा नुपूर शर्मा हीचे समर्थन केल्याप्रकरणी खून करण्यात आला होता. त्यानंतर देशभरात या खूनाचे पडसाद उमटले होते. या सगळ्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला असून आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत आरोपी मोहम्मद रियाझ, घोश मोहम्मद यांचे राजकीय कनेक्शन उघड झालं आहे. मुख्य आरोपी मोहम्मह रियाझ याचे भाजपच्या नेत्यासोबत असलेले फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

(Udaypur Murder Case Updates)

उदयपूर हत्याकांडातील आरोपी मोहम्मद रियाझ याचे भाजपचे नेते गुलाबचंद कटारिया यांच्यासोबतचे फोटो तपासात समोर आला आहे. हा फोटो २०१८ सालचा असून भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाशी संबंधित असलेल्या एका कार्यकर्त्याची पोस्ट समोर आली आहे ज्यामध्ये रियाझ या आरोपीला भाजपा कार्यकर्ता असं संबोधलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागले असून या गुन्हात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Udaipur Case
उदयपूर हत्या प्रकरण: मंत्रालयाचे सोशल मीडियाला स्पष्ट निर्देश; ताबडतोब...

दरम्यान काँग्रेसकडून याप्रकरणी भाजपवर आरोप केले जात आहेत. आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असून ही हत्या भाजपने केली असल्यामुळे हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी सांगितलं. दरम्यान, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्यकर्ते इर्शाद चैनवाला यांच्या एका पोस्टमध्ये रियाझ दिसत आहे. हा फोटो २०१९ चा असून चैनवाला हे रियाझला हार घालताना दिसत आहेत. यासंदर्भात बोलताना चैनवाला म्हणाले की, रियाझ हा मक्का मदिनाची यात्रा करून आला होता त्यामुळे त्याचे हार घालून स्वागत केले होते. मोहम्मद ताहिर यानेच त्याची भेट घालून दिली होती. आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही असं चैनवाला म्हणाले आहेत. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

Udaipur Case
Udaipur Murder : अजमेर शरीफच्या मौलवीसह ५ जणांना अटक

दरम्यान नुपूर शर्मा या भाजपा प्रवक्त्या महिलेने मोहम्मद पैगंबरावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे राजस्थानातील उदयपूर येथे एका टेलरची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभर या हत्येचे पडसाद उमटले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अमरावती येथेही उमेश कोल्हे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली असून नुपूर शर्मा याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान हे दोन्ही प्रकरणे राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.