Udaipur Murder : अजमेर शरीफच्या मौलवीसह ५ जणांना अटक

Udaipur Murder Five arrested in Kanhaiya Lal murder case
Udaipur Murder Five arrested in Kanhaiya Lal murder caseUdaipur Murder Five arrested in Kanhaiya Lal murder case
Updated on

उदयपूर : कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उदयपूर आणि अजमेरमधून आणखी पाच जणांना अटक (arrested) केली आहे. उदयपूरमधून अटक केलेल्या मौसीन व आसिफ या दोन आरोपींवर हत्येच्या कटात सहभाग असल्याचा आरोप आहे. अजमेरमध्ये अटक केलेल्या आरोपींनी ‘सिर तन से जुदा’चा नारा दिला होता. यातूनच प्रेरित होऊन आरोपींनी कन्हैयालालची हत्या (Murder) केल्याचा पोलिसांना संशय आहे. (Udaipur Murder Five arrested in Kanhaiya Lal murder case)

आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ते कट रचण्यात आणि हत्येच्या तयारीत सहभागी होते, असे मौसीन व आसिफच्या अटकेची पुष्टी करताना उदयपूर (Udaipur) रेंजचे आयजी प्रफुल्ल कुमार म्हणाले. एनआयएने मोहम्मद रियाझ अटारी आणि गौस मोहम्मद यांना ताब्यात घेण्यासाठी उदयपूर न्यायालयात अर्ज केला आहे. दोन्ही आरोपींना गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Udaipur Murder Five arrested in Kanhaiya Lal murder case
‘ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले...’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

अजमेर पोलिसांनी द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपाखाली मौलवीसह तीन जणांना अटक केली आहे. त्यांनी पैगंबराच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी शिरच्छेद करण्याचे आवाहन केले होते. १७ जून रोजी अजमेर दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिलेल्या द्वेषपूर्ण भाषणातून दोन जणांनी मंगळवारी उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या (Murder) केल्याचा पोलिसांना संशय आहे. कन्हैयालालची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी घोषणा दिल्या.

मौलवी फकर जमाली, रियाझ आणि ताजिम अशी अटक (arrested) केलेल्यांची नावे आहेत, असे दरगाह पोलिस ठाण्याचे एसएचओ दलवीर सिंग यांनी सांगितले. अजमेरचे पोलिस अधीक्षक विकास शर्मा यांनी सांगितले की, मुख्य आरोपी गौहर चिश्ती हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. आरोपी अजमेर दर्ग्याच्या निजाग गेटमधून दिलेल्या द्वेषपूर्ण भाषणावेळी गौहर चिश्तीसोबत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()