रशिया-युक्रेन युद्धात उदनराजेंची उडी; म्हणाले मी प्रयत्नशील आहे, पण..

Udayanraje Bhosale News
Udayanraje Bhosale Newsesakal
Updated on
Summary

'युध्द करणाऱ्या लोकांना कळतं कसं नाहीय. यातून काय साध्य होणार आहे.'

Russia Ukraine War : रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढवलीय. अशातच आतापर्यंत युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेनं मात्र आता हात वर केले आहेत. युक्रेनमध्ये (Ukraine) सैन्य पाठवणार नसल्याचा मोठा निर्णय अमेरिकेनं घेतलाय. नाटो देशांनीही युक्रेनकडं पाठ फिरवली असल्याचं दिसतंय. त्यामुळं बलाढ्य रशियापुढं युक्रेनचा एकाकी लढा सुरुय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रशियाच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेसह अनेक देश एकटवले असून निर्बंध लावले आहेत. भारतातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असून भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय.

उदयनराजे म्हणाले, युध्द करणाऱ्या लोकांना कळतं कसं नाहीय. यातून काय साध्य होणार आहे. गेली अनेक वर्ष युध्दच होताहेत; पण यातून काय साध्य झालं, याचाही विचार करणं गरजेचं आहे. यापूर्वी डोंगर, नद्या, सीमा होत्याचं की तेव्हा बरं अशी युध्द झाली नाहीत. या युध्दाचा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होणार आहे आणि ते जगाला परवडणारं नाहीय. अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, मी प्रयत्नशील आहेच; पण काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारनं जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत. त्यांना भारतात सुखरूप आणण्यासाठी संपूर्ण पणाला लावलं पाहिजे आणि हे युध्द वेळीच थांबेल अशी आशा करुयात, असंही त्यानं सांगितलं.

युक्रेन आणि रशियामधील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी सांगितलं की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 316 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रशियन लोकांनी ताब्यात घेतलेल्या ओडेसा प्रदेशातील झमीनी बेटावरील सर्व सीमा रक्षकांचा समावेश आहे. रशियानं युक्रेनमध्ये लष्कर घुसवल्यानंतर अमेरिका आणि अन्य नाटो (NATO) देश त्यांना मदत करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, सध्या तरी युक्रेनचा एकाकी लढा सुरू असल्याचं दिसतंय. नाटो देशांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.