शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. सांगली लोकसभा निकालावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आज विशाल पाटील, विश्वजीत कदम आणि चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट घेतली.
लोकसभा निवडणूक सांगली लोकसभेमुळे चांगलीच गाजली. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदार दिला होता. त्यामुळे देशात खळबळ माजली होती. पण विशाल पाटील यांनी आपली भूमिका सोडली नाही. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला होता. भाजपकडून संजय पाटील मैदानात होते, मात्र विशाल पाटील यांनी मैदान राखलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "विशाल पाटील, विश्वजित कदम, चंद्रहार पाटील ही तरुण मुलं. त्यावेळी घडायला नको होत ते झालं. पण तिथे भाजप जिंकला नाही याचा आनंद आहे. चंद्रहार पाटील पडले त्याचं दु:ख आहे पण तिथे भाजप जिंकला नाही याचा आनंद."
सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. विशाल पाटील यांना ५ लाख ७२ हजार ६६६ मते मिळाली, तर संजयकाका पाटील यांना ४ लाख ७१ हजार ६१३ मते मिळाली. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना ६० हजार ८६० मते मिळाली. विशाल यांचा १०००५३ मतांनी विजय झाला होता.
सांगली लोकसभा मतदारसंघावर यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष होते. कारण सांगली काँग्रेसचे विशाल पाटील यांनी केलेला बंड चर्चेत आला. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली म्हणून ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार दिला. २०१४ ला भाजपने मोदी लाटेत काँग्रेसच्या गडावर विजय मिळवला होता. भाजप उमेदवाराने २०१४ ला अडीच लाख मतांनी, तर २०१९ ला दीड लाख मतांनी विजय मिळविला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.