UGC-NET परीक्षा रद्द; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने NTA चा मोठा निर्णय

Competitive Exam
Competitive Examsakal
Updated on

नवी दिल्लीः नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी UGC-NET परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. "परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे," असे शिक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जून २०२४ रोजी देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेली युजीसी नेट परीक्षा २०२४ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहदे. एनटीएकडून ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये पेन आणि पेपर या पारंपारिक पद्धतीने आयोजित केली होती.

१९ जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून काही इनपूट प्राप्त झाले होते. त्यानुसार मंगळवारच्या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचा संशय बळावत होता.

Competitive Exam
Frog Found in Wafers : गुजरातमध्ये वेफर्सच्या पाकिटात आढळले मृत बेडूक! महिलेची प्रशासनाकडे तक्रार

परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसी-नेट २०२४ परीक्षा रद्द झाली आहे. आता पुन्हा नव्याने परीक्षा होणार आहे. त्याची माहिती स्वतंत्रपणे उमेदवारांना दिली जाईल. याशिवाय प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला पाचारण करण्यात आलेलं आहे.

यूजीसी नेट परीक्षा देशभरातील 317 शहरांमधील 1205 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी 11,21,225 उमेदवार बसले होते. 18 जून रोजी झालेल्या नेट परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती. एनटीएने एकाच दिवसात सर्व 83 विषयांसाठी परीक्षा घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.