कपाळाला आडवं गंध, डोळ्यात सुरमा अन् महाकालचं नाव... हीच आहे कश्यप टोळीची ओळख!

आता हा दुर्लभ कश्यप कोण आहे असं म्हणण्यापेक्षा, कोण होता तो असं विचारणं योग्य ठरेल.
Durlabh Kashyap
Durlabh Kashyapesakal
Updated on
Summary

आता हा दुर्लभ कश्यप कोण आहे असं म्हणण्यापेक्षा, कोण होता तो असं विचारणं योग्य ठरेल.

उज्जैन : कपाळावर टिळा, डोळ्यात सुरमा, खांद्यावर काळा गमचा आणि गुन्ह्यापूर्वी महाकालचं नाव... ही ओळख आहे उज्जैनमधील (Ujjain) दुर्लभ कश्यप (Durlabh Kashyap) टोळीची! सोशल मीडियावर या टोळीचा मोठा वावर आहे. वादग्रस्त प्रकरणं निकाली काढण्यासाठी टोळीचा म्होरक्या दुर्लभ कश्यप सोशल मीडियावर (Social Media) जाहिराती द्यायचा. सप्टेंबर 2020 मध्ये टोळीयुद्धात त्याची हत्या झालीय.

दुर्लभच्या हत्येनंतर या टोळीनं कधीच मोठी घटना घडवली नाही. पण, सोमवारी इन्सास रायफलसह आलेल्या व्हिडिओनं पोलीस खात्यात खळबळ उडालीय. आजही इन्स्टाग्रामवर दुर्लभ टोळीची अनेक पेज आहेत, ज्यावर शस्त्रांसह पोस्ट टाकल्या जातात. वयाच्या 16 व्या वर्षी एवढी मोठी टोळी गुन्हेगारीच्या दुनियेत येणं आणि दुर्लभ मोठा गुन्हेगार होणं हे आम्ही तुम्हाला सांगू..

कोण आहे दुर्लभ कश्यप?

दुर्लभ कश्यपचा जन्म 8 नोव्हेंबर 2000 रोजी उज्जैन जिल्ह्यातील जिवाजीगंजमधील अब्दालपुरा इथं झाला. वडील सरकारी नोकरी करायचे, तर आई शिक्षिका होती. जन्मानंतर दोघांनीही प्रेमानं त्याचं नाव 'दुर्लभ' ठेवलं. भविष्यात काहीतरी वेगळं करेल, असं पालकांना वाटलं. पण, त्यानं आयुष्यात काहीतरी वेगळं केलं. परंतु, समाज आणि कुटुंबासाठी दुर्लभ एक अरिष्ट बनला. दुर्लभ त्याच्या आई जवळ होता, तर वडील काही कामानिमित्त इंदूरला राहायचे.

Durlabh Kashyap
..तर भाजप-टीएमसी खासदारांना मी फोन करु शकणार नाही; असं का म्हणाल्या मार्गारेट अल्वा?

कश्यपला मांजरांची खूप आवड होती

उज्जैनमध्ये राहून दुर्लभ शिक्षण घेत होता. दुर्लभला जवळून ओळखणारे लोक सांगतात की, त्याला मांजरांची आवड होती. दुर्लभ कश्यपला मांजरांची खूप आवड होती. या दरम्यान लहान वयातच त्याला गुन्हेगारीचीही आवड निर्माण झाली. सोशल मीडियाच्या मदतीनं तो आपल्या गुंडगिरीचा प्रचार करत होता. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून त्यानं शस्त्रांसह फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली. तो लोकांना धमक्याही देत ​​असे. यादरम्यान सोशल मीडियावर त्याच्या स्टाइलमुळं लोक सामील होऊ लागली. वयाच्या 16 व्या वर्षी त्याची टोळी दहशत पसरवण्यासाठी सज्ज झाली होती.

Durlabh Kashyap
Durlabh Kashyap

वयाच्या 16 व्या वर्षी टोळी तयार झाली

सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक दुर्लभ कश्यपशी कनेक्ट होत होते. यामुळं त्याला आणखी बळ मिळालं. आपल्यासोबत तरुणांची वाढती गर्दी पाहून दुर्लभ कश्यपनं उज्जैनमध्ये गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केला. लवकरच त्याचं नाव उज्जैन शहरात प्रसिद्ध झालं. त्यानंतर तो छोटे-छोटे गुन्हे करू लागला. या टोळीतील लोकांची काम करण्याची स्वतःची खास शैली होती. त्यानं तरुणांची एक मोठी टोळी तयार केली. कुख्यात बदमाश, मारेकरी, व्यावसायिक गुन्हेगारांनी कोणत्याही वादासाठी संपर्क साधावा, अशी जाहिरात दुर्लभ कश्यपनं फेसबुकवर शेअर केली.

Durlabh Kashyap
छत्रपतींच्या बाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : राऊत

कश्यपच्या टोळीचा होता वेगळा ड्रेस कोड

दुर्लभ कश्यपची टोळी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणं काम करायची. या टोळीची स्वतःची स्टाइल आणि ड्रेस कोड होता. या टोळीतील सर्व सदस्य कपाळावर टिळा, डोळ्यात सुरमा आणि खांद्यावर काळा दुपट्टा बांधायचे. यासोबतच टोळीचे सदस्य कधी-कधी काळे कपडे घालायचे.

Durlabh Kashyap
Durlabh Kashyap

वयाच्या 18 व्या वर्षात तब्बल नऊ गुन्हे दाखल

उज्जैनमध्ये टोळीची गुंडगिरी वाढत होती. पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. उज्जैन पोलिसांनी या टोळीवर छापे टाकण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यावेळी दोन डझनहून अधिक मुलांना पकडलं होतं. ऑक्टोबर 2018 मध्ये दुर्लभला 23 साथीदारांसह पकडण्यात आलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षी त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल झाले होते. यानंतर तो कारागृहातूनही टोळी चालवत होता. टोळीचे सदस्य गुन्हे केल्यानंतर महाकालचं नाव घेत असतं.

टोळीयुद्धात दुर्लभ कश्यप ठार

दुर्लभ कश्यप दोन वर्षे तुरुंगात होता. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात त्याची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दुर्लभ पुन्हा गुन्हेगारीच्या दुनियेत सक्रिय झाला. यादरम्यान त्याचे जुने शत्रू पुन्हा सक्रिय झाले. दुर्लभ कश्यप 6 सप्टेंबर 2020 रोजी एका टोळीयुद्धात मारला गेला. रात्री दोन वाजता चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर उज्जैनमध्ये खळबळ उडाली.

Durlabh Kashyap
Durlabh Kashyap

टोळीचे सदस्य इंसास रायफलसह दिसले

उज्जैनमध्ये सोमवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कश्यप टोळीतील सदस्य इन्सास रायफल फिरवत होते. ही रायफल निमलष्करी दलाला देण्यात आलीय. अशा परिस्थितीत या टोळीकडं हे हत्यार कुठून आलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासोबतच एक निलंबित पोलिसही दिसत आहे. हा व्हिडिओसमोर आल्यानंतर उज्जैन पोलिसांना धक्का बसलाय. तसंच उज्जैनमध्ये कश्यप टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Durlabh Kashyap
आमच्या नादाला लागलात, तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करु; शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीला थेट इशारा

दुर्लभ कश्यपवर चित्रपट

दुर्लभ कश्यपचं नाव आणि स्टाइल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्यामुळंच त्यांच्या निधनानंतर त्याच्यावर चित्रपट बनवला जात आहे. त्याला उज्जैनचा सिंह म्हणूनही ओळखलं जातं. पंजाबी अभिनेता जय रंधावा दुर्लभ कश्यपची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.