रशिया-युक्रेन यांच्यातील वाद वाढल्याने तिथे असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात येत आहे.
नवी दिल्ली - रशिया-युक्रेन यांच्यातील वाद वाढल्याने तिथे असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात येत आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांची संख्या जास्त आहे. एअर इंडियाच्या (Air India) विमानाने त्यांना परत आणलं जातंय. यात सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये शिकणारे विद्यार्थी मंगळवारी रात्री भारतात पोहोचले. त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, रशिया आणि पूर्व युरोपिय देशांमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे आम्ही भारतात आलो. मायदेशी आल्यानंतर आनंदी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. युक्रेनमध्ये बहुतांश विद्यार्थी हे एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत.
एअर इंडियाचं विमान एआय १९४६ युक्रेनमधून २४० भारतीयांना घेऊन मंगळवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. युक्रेनची राजधानी क्यीवमधून हे विमान आलं. युक्रेनमधून दिल्लीत पोहोचलेली विद्यार्थीनी रियाने सांगितलं की, युक्रेनमध्ये सध्या स्थिती सामान्य आहे. आम्ही दूतावासाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केले. देशात परतल्यानंतर खूप आनंद होत आहे. युक्रेनमधील परिस्थिती बदलताच भारतीय दुतावासाने आम्हाला युक्रेन सोडण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही भारतात आलो आहे.
शिवम चौधरी या एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितलं की, सध्या युक्रेनमधील परिस्थिती सामान्य आहे, मात्र तणाव कायम आहे. घरी परतल्यानंतर बरं वाटत असल्याची भावना शिवमने व्यक्त केली.
‘देवदूत’ एअर इंडिया
‘एअर इंडिया’ने यापूर्वीही अनेकदा देवदूताची भूमिका बजावली आहे. कोरोना संकटात विदेशातील लाखो भारतीयांना मायदेशी आणण्यात एअर इंडियाने मुख्य भूमिका बजावली होती. १९९० मधील इराक-कुवेत युद्धापासून युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अनेक देशांतील अक्षरशः लाखो भारतीयांना एअर इंडियाने भारतात सुखरूप आणले आहे. इराक युद्धावेळी तर ५९ दिवसांत १० लाख भारतीयांना एअर इंडियाने मायदेशी सुखरूप आणले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.