रशियावर लादलेल्या निर्बंधाचा भारताला फायदा; स्वस्तात खरेदी करणार तेल!

India to buy cheap oil
India to buy cheap oilIndia to buy cheap oil
Updated on

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत रशिया कच्चे तेल आणि इतर वस्तू जगाला विकण्यासाठी धडपडत आहे. रशियाने मित्र देश भारताशी संपर्क साधला आहे. सरकार रशियाकडून कच्चे तेल (cheap oil) आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा विचार करीत आहे, असे दोन भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (India to buy cheap oil)

भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. यामध्ये रशियाकडून आतापर्यंत केवळ २ ते ३ टक्के खरेदी झाली आहे. युक्रेनवर ओढलेल्या संकटानंतर जगात कच्च्या तेलाच्या किमती ४० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, तर दुसरीकडे रशियाला कच्चे तेल स्वस्तात (cheap oil) विकावे लागत आहे. युक्रेनच्या (Ukraine) संकटामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या महागाईचा फटका बसू नये, अशी भारत सरकारची इच्छा आहे.

India to buy cheap oil
...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

या रणनीतीमुळे रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याची योजना तयार केली जात आहे. यामुळे सरकारला महागाईच्या काळात तेलावरील खर्च मर्यादित ठेवण्यास मदत होईल. रशियाकडून (Russia) तेल आणि इतर गोष्टी मोठ्या सवलतीत दिल्या जात आहेत. आम्हाला ते खरेदी करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु, टँकर, विमा कवच यासह अनेक गोष्टींकडे लक्ष देण्यासारखे आहे. एकदा या समस्यांचे निराकरण झाले की, आम्ही खरेदीसाठी पुढे जाऊ, असे भारत सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले.

व्यापाराची यंत्रणा होतेय तयार

निर्बंधानंतर (Economic sanctions ) जगातील अनेक देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र, या निर्बंधाचा आयातीवर परिणाम होणार नसल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या रुपया-रुबलमधील व्यापाराची यंत्रणा तयार केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

India to buy cheap oil
दारूच्या दुकानाची तोडफोड; उमा भारतींनी लिहिले दोन पानी पत्र

भारताचे रशियाशी प्रदीर्घ संबंध

रशियाकडून किती तेल दिले जात आहे आणि किती सवलत दिली जात आहे हे सांगण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिला. या संदर्भात केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधादरम्यान रशियाने मित्र देशांना त्यांच्यासोबत व्यापार आणि गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. भारताचे रशियाशी प्रदीर्घ संबंध आहेत आणि संयुक्त राष्ट्रात त्याच्या विरोधात मतदान करण्यास अनुपस्थित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.