Ukraine Russia War: नवीनच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

नवीनचा मृतदेह परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
basavaraj bommai
basavaraj bommaisakal
Updated on

कर्नाटकातील नवीन शेखरप्पा जेवणासाठी रांगेत उभा असतानाच युक्रेनमध्ये रशियाकडून (Ukraine Russia War) सुरु असलेल्या हल्ल्यात गोळीबार झाला यामध्ये त्याचा जागीच काल मृत्यू झाला. नवीनच्या मित्रांनी त्याच्या मृतदेहाचा फोटो पाठवला आहे, त्याची पुष्टी करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला तो फोटो पाठवण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दिली.

यावेळी बसवराज बोम्मई यांनी नवीनच्या कुटुंबाला भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे. नवीनच्या मित्रांनी त्याच्या मृतदेहाचा फोटो पाठवला आहे तो परराष्ट्र मंत्रालयाला ओळख पटवण्यासाठी देण्यात आला असून, भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. नवीनचा मृतदेह परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच त्याच्या कुटुंबाला भरपाई देण्यात येणार असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले.

नेमके काय घडल

युक्रेनमधील एका किराणा दुकानाबाहेर सकाळी जेवणासाठी काहीतरी वस्तू घेण्यासाठी नवीन थांबला होता. पण काही वस्तू घेण्यापूर्वीच रशियन सैनिकांनी लोकांवर गोळीबार सुरु केला यामध्ये नवीन देखील बळी पडला. गोळीबारानंतर नवीन या विद्यार्थ्याचं पार्थिवाचीही आम्हाला माहिती मिळालेली नाही. जर त्याचं पार्थिव रुग्णालयात नेलं असेल तर आम्ही कोणीही हॉस्पिटलमध्ये जाऊन याबाबत चौकशी करण्याच्या स्थितीत नाही, अशी माहिती होस्टेलवर राहणाऱ्या नवीनचा सहकारी श्रीधरण गोपालकृष्णन यानं सांगितलं. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()