रशिया-युक्रेन युद्ध काळात भारतीय शेतकरी जगाला मदत करतोय : कृषी मंत्री

Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomaresakal
Updated on
Summary

कोरोना महामारीच्या काळात कृषी क्षेत्रानं चांगली कामगिरी केलीय.

कोरोना (COVID) महामारीच्या काळात कृषी क्षेत्रानं चांगली कामगिरी केलीय. FICCI तर्फे आयोजित '8 व्या इंडिया मक्का शिखर समिट 2022'ला संबोधित करताना नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी बंपर अन्नधान्याचं उत्पादन केलंय, तर सरकारनं भात आणि गहू पिकांचं उत्पादन वाढवलं. शिवाय, विक्रमी खरेदी केलीय. भारतातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीनंही चालू काळात 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. जो उत्साहवर्धक आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) जागतिक मागणी वाढल्यानं भारत मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात करत आहे. युद्धाच्या काळात भारतीय शेतकऱ्यांचं उत्पादन जगाला उपयुक्त ठरत आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी सांगितलंय.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर पुढं म्हणाले, भारत (India) देश शेतीवर आधारित आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्राचा उच्च विकास सुनिश्चित करण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं पीएम किसानसह अनेक योजना सुरू केल्या आहेत.

Narendra Singh Tomar
WHO मध्ये सुधारणा आवश्यक, भारत महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार : मोदी

परिषदेत मका लागवडीबाबत बोलताना केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले, मक्याची गरज आणि उपयोगिता सर्वांनाच माहितीय. गहू आणि तांदूळ नंतर मका हे असं पीक आहे, जे सर्वात जास्त घेतलं जातं. अन्नधान्याबरोबरच ते पोल्ट्री फूड, इथेनॉलमध्येही आढळतं. हे बहुमुखी पीक आहे. मक्‍याला चांगला भाव मिळावा, मक्‍यावर आधारित प्रक्रियेला चालना मिळावी या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर एमएसपी वाढवण्याचं कामही कृषी मंत्रालयाकडून केलं जात आहे, असं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.