दारूच्या दुकानाची तोडफोड; उमा भारतींनी लिहिले दोन पानी पत्र

uma bharati wrote Letter to the Chief Minister
uma bharati wrote Letter to the Chief Ministeruma bharati
Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती (Uma Bharati) यांनी वाईनं शॉपमध्ये वीट फेकून तोडफोड केली. भोपाळमध्ये घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आज उमा भारती यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना दोन पानी पत्र लिहून आपल्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रात त्यांनी महिलांच्या व्यथा ऐकून रागाच्या भरात तोडफोड केल्याचे सांगितले. (uma bharati wrote Letter to the Chief Minister)

शिवराज सिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रात उमा भारती (Uma Bharati) यांनी आपली चूक मान्य केली आहे. बारखेडा पठाणी येथे राहणाऱ्या महिलांनी दारूच्या दुकानामुळे कुटुंबावर होणाऱ्या दुष्परिणामांची व्यथा सांगितली. हे ऐकून मी संतापली आणि काही दारूच्या बाटल्या दगडाने फोडल्या, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

ज्या दुकानात बाटल्या फोडल्या ते दुकान दारू धोरणाच्या विरोधात थाटले होते. या दुकानाभोवती मंदिर व शाळा आहे. दारू पिऊन लोक शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील मुलींची छेड काढतात. तिथल्या लोकांनी विरोधही केला होता. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने दुकान हटवले नाही. त्यामुळे महिलांचे अश्रू पाहून रागाच्या भरात दुकानात दगडफेक केली. सात दिवसांत दुकान हटवण्याची मागणीही उमा भारती (Uma Bharati) यांनी पत्रात केली आहे.

uma bharati wrote Letter to the Chief Minister
...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

माजी मुख्यमंत्री उमा भारती दीड वर्षापासून सरकारकडे दारूबंदीची मागणी करीत आहेत. गेल्या आठवड्यापासून उमा यांनी दारूबंदीची मोहीम तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्री ती दारूच्या दुकानात शिरली. यानंतर दगड उचलून अनेक दारूच्या बाटल्या फोडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काँग्रेसने हल्लाबोल केला

भाजपमध्ये (BJP) अंतर्गत गटबाजी सुरू आहे. एकीकडे सरकार दारू स्वस्त करीत आहे तर दुसरीकडे लोकप्रियतेसाठी गुंडगिरी करून तोडफोड केली जात आहे, असे म्हणत काँग्रेस (Congress) आमदार सज्जन सिंह वर्मा यांनी भाजप व उमा भारतींवर हल्लाबोल केला. दगडफेकीच्या विरोधात सरकारने कायदा केला तो कुठे आहे. दगडफेक करणाऱ्यांकडून वसुलीची कायद्यात तरतूद आहे. आता दगडफेक करणाऱ्यांकडून वसुली होणार का, असा प्रश्न पीसीसी अध्यक्षांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी विचारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()