2019 ची निवडणूक न लढवण्याचं कारणही त्यांनी यावेळी सांगितलं.
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी पुन्हा एकदा निवडणूक (Madhya Pradesh Election) लढवण्याची घोषणा केलीय. 2024 मध्ये त्या निवडणूक लढवणार असल्याचं छत्तरपूरमध्ये जाहीर केलं; पण त्या कुठून लढणार याचं उत्तर मात्र दिलं नाही. उमा भारती यांनी नुकतीच छत्तरपूर जिल्ह्यातील (Chhatrapur District) गंज गावात हनुमान कुटी मंदिरात पूजा केली. केन बेतवा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, उमा भारती या काल (रविवार) गंज गावातील हनुमान मंदिरात पोहोचल्या होत्या. इथं त्यांनी या योजनेसाठी नवसही मागितला होता. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, उमा भारतींनी उपस्थितांना संबोधित केलं.
उमा भारती यांची घोषणा होताच, उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. पक्षनेतृत्वानं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) प्रचाराची धुराही त्यांच्यावर सोपवलीय. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, उमा भारतींनी निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर सांगितलं की, मी कधीही निवडणूक लढवणार नाही, असं म्हंटलं नव्हतं. 2019 ची निवडणूक न लढवण्याचं कारणही त्यांनी यावेळी सांगितलं. 2024 मध्ये निवडणूक कुठून लढवणार? असा प्रश्न भारती यांना विचारला असता, त्यांनी याचं उत्तर देणं टाळलं.
तर, दुसरीकडं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी रविवारी देवरियामध्ये जाहीर सभा घेतली. शिवराज सिंह यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अखिलेश यादव हे आजचे औरंगजेब आहेत. त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकलं आणि भावाला मारहाण केली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.