दिल्ली दंगल: कोर्टाचा उमर खालिदला जामीन देण्यास नकार

umar khalid
umar khalidSAKAL
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली कोर्टाने आज जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला 2020 च्या पूर्वोत्तर दिल्ली भागातील हिंसेसंदर्भात जामीन देण्यास नकार दिला आहे. या दंगलीमागे एक मोठा कट असल्याचं ठरवत कोर्टाने त्याचा जामीन नाकारला आहे. उमर खालिदला 14 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून खालिद दिल्लीच्या तिहार तुरुगांतच कैद आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी 3 मार्च रोजी खालिद आणि फिर्यादी पक्षाचे वकील यांची साक्ष ऐकल्यानंतर आपला निर्णय राखीव ठेवला होता. (Umar Khalid)

umar khalid
कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ६० दिवसांत मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश

पुराव्यांची कमतरता

सुनावणी दरम्यान आरोपीने कोर्टाला म्हटलं होतं की, फिर्यादी पक्षाकडे त्याच्याविरोधात खटला चालवण्यासाठी ठोस पुराव्यांच्या अभाव आहे. उमर खालिद (Umar Khalid) तसेच इतर अनेक जणांविरोधात फेब्रुवारी 2020 मधील दंगलींसंदर्भात दहशतवाद विरोधी कायदा UAPA अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. या दंगलीमध्ये 53 लोक मारले गेले होते. तसेच 700 हून अधिक जखमी झाले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान हिंसा भडकली होती. या हिंसेचे पर्यवसान मोठ्या दंगलीमध्ये झालं होतं.

umar khalid
उद्योगमंत्री देसाईंना उच्च न्यायालयाचा दणका, प्लॉटचा ताबा घेण्यास अंतरिम मनाई

उमर खालिदशिवाय अन्य जणांवरही गुन्हा

उमर खालिदशिवाय (Umar Khalid), कार्यकर्ता खालिद सैफी, जेएनयूची विद्यार्थिनी नताशा नरवाल आणि देवांगना कालिता, जामिया समन्वय समितीचे सदस्य सफूरा जरगर, आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन तसेच इतर अनेक जणांविरोधात देखील UAPA अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()