उमेशच्या हत्येत त्याचा हात असल्याचा आरोप उमेशच्या कुटुंबीयांनी केलाय. अतिकचा भाऊ अश्रफसह पोलिसही पोहोचले आहेत.
Atiq Ahmed News : कोर्टातून मोठी बातमी समोर येत आहे. अतिक अहमदनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) त्याला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. न्यायालयानं याला स्पष्ट नकार दिलाय.
न्यायालयानं अतिकला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलंय. यूपी पोलीस सोमवारी संध्याकाळी अतिक अहमदला घेऊन प्रयागराजला पोहोचले आहेत. आज त्याला एमपी-एमएलए न्यायालयात हजर करण्यात येत आहे. तिथं त्याच्या गुन्ह्यांचा हिशेब घेतला जाईल आणि त्याला शिक्षा होऊ शकते.
अतिकला रविवारी संध्याकाळी गुजरातमधून यूपीत आणण्यात आलं. सोमवारी पोलिस पथकासह नैनी कारागृहात त्याला नेण्यात आलं. उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी अतिक अहमद याच्यावर आज सुनावणी आहे. आज या सुनावणीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
उमेशच्या हत्येत त्याचा हात असल्याचा आरोप उमेशच्या कुटुंबीयांनी केलाय. अतिकचा भाऊ अश्रफसह पोलिसही पोहोचले आहेत. एमपी-एमएलए न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण, त्याआधी सर्वोच्च न्यायालयाकडून अतिकसाठी वाईट बातमी आहे. अतिकनं आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयानं त्याची मागणी फेटाळून लावलीये. उमेश पाल यांची प्रयागराजमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी यूपी पोलिसांनी कडक भूमिका घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.