मृत्यूही महागला! रुग्णवाहिकेसाठी भाडं नसल्यानं लेकाचा मृतदेह पिशवीत ठेवुन बापानं केला 200 किमीचा प्रवास

रुग्णवाहिका चालकाने मुलाच्या वडिलांकडे आठ हजार रुपयांची मागणी केली होती.
Bengal News
Bengal News
Updated on

Bengal News: पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांना आपल्या 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन बसने 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

भाजपने ममता बॅनर्जी सरकारच्या 'स्वास्थ्य साथी' योजनेवर टिका केली आहे, तर तृणमूल काँग्रेसने हे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

मुलाचे वडील अशिम देबशर्मा यांनी रविवारी सांगितले की त्यांच्या 5 महिन्यांच्या मुलाचा शनिवारी रात्री सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या 6 दिवसांपासून या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारासाठी 16 हजार रुपये खर्च झाले.

'मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाही'

रविवारी अशिमने रुग्णवाहिका चालकाला मुलाचा मृतदेह कालियागंज येथील त्याच्या घरी नेण्याची विनंती केली असता चालकाने त्याच्याकडे 8 हजार रुपयांची मागणी केली.

आशिम यांनी दावा केला की 102 नंबरवर चालणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाने त्यांना सांगितले की रुग्णांसाठी ही सुविधा मोफत आहे, परंतु मृतदेह वाहून नेण्याचा कोणताही नियम नाही.

अशिम देबशर्मा यांच्याकडे रुग्णवाहिका चालकाला देण्यासाठी 8 हजार रुपये नव्हते, म्हणून त्यांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसमधून कालियागंजला नेण्याचा निर्णय घेतला.

देबशर्मा यांनी मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी ते 200 किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंजपर्यंत बसने प्रवास केला.

बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्याने त्याचा सुगावा लागू दिला नाही. इतर प्रवाशांना हा प्रकार कळला तर ते त्याला बसमधून उतरवतील, अशी भीती अशिमला होती.

Bengal News
Online Frauds: भारतातील 57 टक्के फसवणूक होते ऑनलाइन, 26 टक्के कंपन्यांना बसलाय 10 लाखांपेक्षा जास्त भुर्दंड

भाजपने टीएमसी सरकारला घेरले

ही घटना उघडकीस आल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारच्या 'स्वास्थ्य साथी' आरोग्य विमा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भाजप गलिच्छ राजकारण करत आहे: टीएमसी

भाजपच्या प्रश्नावर उत्तर देत टीएमसीने मुलाच्या मृत्यूमागे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. टीएमसीचे राज्यसभा खासदार शंतनू सेन म्हणाले की, 'भाजप मुलाच्या दुर्दैवी मृत्यूवरून घाणेरडे राजकारण करत आहे.'

अशीच एक घटना या वर्षी जानेवारी महिन्यात बंगालच्या उत्तरेकडील जलपाईगुडी जिल्ह्यात घडली होती. येथील एका व्यक्तीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असता, रुग्णवाहिका चालकाने मृतदेह घरी नेण्याऐवजी पैशांची मागणी केली.

पैशाअभावी तो माणूस आपल्या आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या घराकडे निघाला. मात्र, काही अंतर चालल्यानंतर एका समाजसेवी संस्थेने त्यांना मोफत वाहन उपलब्ध करून दिले.

Bengal News
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()