Video Viral : Unacademyच्या शिक्षकाकडून PM मोदींची तुलना मोहम्मद घोरीशी; म्हणाले, 'नवीन संसद त्यांचा राजवाडा...'

अनअकॅडमीच्या शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली मुहम्मद घोरीशी
Video Viral
Video ViralEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना अनेकदा इतर व्यक्तीसोबत केल्याचे दिसून येते. मात्र काही लोक त्यांच्यावर टीका देखील करत असतात. आता चक्क एका शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मुघल राज्यकर्ता मोहम्मद घोरी याच्याशी केली आहे.

याआधी देखील अनअकॅडमीचे शिक्षक करण सांगवान यांनी विद्यार्थ्यांना सुशिक्षित उमेदवारांना मत देण्यास सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा अनअकॅडमी चर्चेत आली आहे. अनअकॅडमीचे शिक्षक अवध ओझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोहम्मद घोरीशी केली आहे.

Video Viral
Weather Update : पुणे, मुंबईसह राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पुढील ४८ तास महत्त्वाचे, आज 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

शिक्षकाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शिक्षक अवध ओझा हे मुघल घराण्याप्रमाणे मोदी घराणेही असेल असे म्हणताना दिसत आहे. ते पुढे म्हणतात की, पंतप्रधान मोदींना मुले नसतील तर हा मुद्दा नाही कारण मोहम्मद घोरीलाही मूल नव्हते.

ते पुढे म्हणतात की संसदेची नवी इमारत मोदींचा राजवाडा असेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video Viral
Mumbai News : मुंबई विमानतळाबाहेर ड्युटीवरील CISF जवानाला 'बीएमडब्लू'ने उडवलं; १९ वर्षीय मुलगा ताब्यात

काय म्हणाले शिक्षक अवध ओझा?

सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत. संविधान वगैरे भंग केलं पाहिजे. आता वेळ आहे त्यांनी मुकूट घालायची. मुघलं घराणं पुस्तकातून काढण्यात आलं आहे, त्यामुळं आता कुठलंतरी घराणं शिकावं लागेल.

मोहम्मद घोरीलाही मूल नव्हते. जे कमांडर होते तेच त्यांची मुलं होती. संसदेची नवी इमारत मोदींचा राजवाडा असेल, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Video Viral
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळणार; राज्य सरकारने कंपन्यांना दिले ४०६ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.