Karnataka : अनधिकृत रिसॉर्ट हटविण्याची नोटीस

वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले असून त्यांनी पश्चिम घाटातील सर्व अनधिकृत होम स्टे आणि रिसॉर्ट हटवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
Karnataka
Karnataka sakal
Updated on

बंगळूर: वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले असून त्यांनी पश्चिम घाटातील सर्व अनधिकृत होम स्टे आणि रिसॉर्ट हटवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

कर्नाटकातील शिरूरजवळ भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कर्नाटकातही कॉफीचे मळे, घरे, होमस्टे, रिसॉर्ट्स बनवण्यासाठी निसर्ग संपन्न पश्चिम घाटाच्या डोंगररांगा आणि जंगले तोडली आहेत.

अशास्त्रीय पद्धतीने डोंगर खोदून व मुळाशी माती घट्ट धरून ठेवणारे वृक्ष तोडून रस्ते तयार केल्यामुळे अशा आपत्तीची पुनरावृत्ती होत असल्याचे तज्ज्ञांचे मत सरकारने गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे चिक्कमंगळूर, शिमोगा, म्हैसूर, चामराजनगर, बेळगाव यासह राज्यातील पश्चिम घाटात २०१५ पासून बेकायदा पद्धतीने आणि वनक्षेत्रावर अतिक्रमण करून बांधलेल्या होम स्टे आणि रिसॉर्टवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, उडुपी, कोडगू, हासन या विभागाच्या उपमुख्य सचिवांना महिन्याच्या आत केलेल्या कारवाईच्या तपशीलासह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.