सागरतळाशी संशोधक घेणार जीवसृष्टीचा वेध; 6000 मीटर खोलीपर्यंत जाणार

या सगळ्या प्रकल्पावर ४०७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
Under Sea
Under SeaSakal
Updated on

नवी दिल्ली : जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी भारतीय संशोधक आता महासागराचा तळ ढवळून काढणार असून यासाठी ते थेट समुद्राच्या तळाशी सहा हजार मीटर खोलीपर्यंत जाणार आहेत. यातून पृथ्वीचे आणि जीवसृष्टीचे अनेक अज्ञात पैलू समोर येऊ शकतात अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. या महाशोध प्रकल्पात समुद्रामध्ये पाचशे मीटर खोलीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतील. या सगळ्या प्रकल्पावर ४०७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन याबाबत बोलताना म्हणाले की, ‘‘ जीवसृष्टीच्या निर्मितीबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. समुद्रामध्ये चार ते पाच किलोमीटर खोलीवर पृष्ठभागाशी आढळून येणाऱ्या हायड्रो- थर्मल व्हेंट्समध्ये जीवसृष्टीच्या निर्मितीचे मूलस्थान असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत हे सगळे काही आपल्यापासून अज्ञातच होते. या व्हेंट्समध्येही सुक्ष्मजीव आढळून येतात. सागर तळाशी खोलीवर कसे काय जीवन अस्तित्वात आले असेल? अस्तित्वात आल्यानंतर ते कसे काय टिकले? हे देखील एक गौडबंगालच आहे. या मोहिमेमुळे आपल्याला सागरतळाचा वेध घेता येईल, येथेच मौल्यवान धातू आणि खनिजेही दडलेली आहेत. सागरतळाशी उत्खनन करणारे आणखी प्रभावी तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झाल्यास ही खनिजे आपल्याला बाहेर काढता येणे शक्य होईल. ’’

नवे दालन खुले होणार

सागरी सुक्ष्मजीवशास्त्राचे नवे दालन यामुळे खुले होणार असून भविष्यामध्ये या क्षेत्रातही अनेक संधी निर्माण होऊ शकतात. खोल समुद्रतळाशी उत्खनन करणारे तंत्रज्ञान आजमितीस आपल्याकडे उपलब्ध नाही. आपण यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचाच आधार घेत आहोत यासाठी देशातील आघाडीच्या संस्था आणि उद्योगांशी भागीदारी करण्यात येईल, असे मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.