ढाका : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे बांगलादेशी नागरिकांनी स्वागत केले आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बांगलादेशातील अस्थिरता संपुष्टात आणून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करेल, त्याचप्रमाणे निःपक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया राबवून देशात पुन्हा लोकशाही स्थापन करेल ,अशी आशा बांगलादेशातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.