छोटा राजन जीवंत आहे; एम्सचे स्पष्टीकरण

दिल्लीच्या एम्सकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याची ANI ने दिली माहिती
Chhota Rajan
Chhota Rajan
Updated on

दिल्ली: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Underworld Don Chhota Rajan) शुक्रवारी कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर तो अद्यापही जीवंत असल्याचे 'एम्स'कडून (AIIMS) स्पष्टीकरण देण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे (Covid 19) निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. छोटा राजनवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरु आहेत. त्याला दिल्लीत एम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिहार जेलमध्ये असताना त्याला कोरोनाची लागण झाली. एप्रिलच्या अखेरीस त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Covid Positive) आला होता. त्याची प्रकृती स्थिर होती, मात्र तब्येतीची तक्रार असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, पण अखेर 'एम्स'ने तो अद्याप जीवंत असल्याचे स्पष्ट केले. (Underworld don Chhota Rajan is still alive clarification from AIIMS official Delhi)

छोटा राजनविरोधात ७० हून अधिक प्रकरणे

छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधित ७०हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तसेच त्याला पत्रकार ज्योति डे यांच्या हत्येप्रकरणी दोषीदेखील ठरविण्यात आले. त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याने तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले. छोटा राजन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. छोटा राजनवर सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत, पण कारागृहाच्या आतील गँगवॉरच्या भीतीने त्याला कधीही मुंबईच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेले नाही. २०१५ ला त्याला विदेशातून गुन्हेगार हस्तांतरणाच्या मार्फत त्याला भारतात आणण्यात आले आणि तेव्हापासून त्याला तिहार जेलमध्येच ठेवण्यात आले. तिहारमध्ये असतानाच त्याला कोरोना झाला आणि त्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.