Daud Ibrahim Surrender: फूलनदेवीची गोष्ट ऐकून दाऊदही करणार होता सरेंडर, या महिला पत्रकाराने त्याला दिला होता सल्ला

Underworld Don Daud: एका महिला पत्रकाराने दाऊद इब्राहिमला सरेंडर करण्याचा सल्ला दिला होता, जो त्याने मान्यही केला होता.
Daud Ibrahim with Shila Bhutt
Daud Ibrahim with Shila BhuttEsakal
Updated on

Daud Ibrahim surrender:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याबद्दल नेहमी बातम्या समोर येत असतात. तो कुठे आहे ? तो जिवंत आहे की मेला?असे अनेक प्रश्न आहेत, ज्याचं अचूक उत्तर आजपर्यंत मिळालं नाही.नुकतंच, देशातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर शीला भट्ट यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन दाऊदसोबत एक फोटो शेअर केला,जो बराच व्हायरल झाला. फोटोमध्ये शीला भट्ट दाऊदची मुलाखत घेताना दिसत आहेत.

त्यांनी अनेक वेळा मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन्सची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये करीम लालापासून वरदराजन मुदलियार आणि छोटा शकीलपासून दाऊद इब्राहीम यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी दाऊद इब्राहीमच्या दुबई येथील घरात त्यांची मुलाखत घेतली होती.त्या अनेक वर्ष माफिया डॉनच्या संपर्कात होत्या. त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये दाऊद इब्राहीमबद्दल अनेक रंजक किस्से सांगितले होते.

शीला भट्ट यांच्या तोंडून दाऊदची कहाणी

मी जेव्हा क्राईम रिपोर्टींग करत होते, तेव्हा माझी पोलिसवाल्यांसोबत चांगली ओळख झाली होती. एक दिवस एका पोलिसवाल्याने मला विचारलं की करीम लालाचा नंबर पाहिजे? मी त्याच्याकडून नंबर घेतला आणि करीम लालांना भेटले. चित्रलेखा मॅगझिनमध्ये एक लेख छापला, ज्यात करीम लालाचा फोटो छापला. (Latest Marathi News)

त्या लेखात करीम लालाच्या दोन बायकांचा उल्लेख आहे. त्यांची एक बायको त्यावेळी भांडे धुवत होती. करीम लालासोबत जेव्हा माझा फोटो छापला गेला तेव्हा माझी खूप चर्चा झाली होती. हा लेख ड्रग्जच्या व्यवसायाबद्दल होता.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Hruta Durgule: मिस्टर शाह तुमचा जयजयकार! हृता दुर्गुळेने केलं अहोंचं अभिनंदन, हे आहे खास कारण

त्या काळात करीम लालाचा एक वेगळा रुतबा होता. तो त्या काळच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधींना देखील यांना देखील भेटला होता. फोटो छापला गेल्यावर गुजरात किनारपट्टीवर राहणाऱ्या खारवा लोकांमध्ये माझी लोकप्रियता वाढली.(Latest Marathi News)

त्या लोकांनी दाऊदला फोन केला आणि मला भेटण्यासाठी त्याला प्रेरित केलं.त्या काळत सोन्याचे बिस्किट आणि घड्याळांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत होती. हा तो काळ होता, जेव्हा दाऊद इब्राहीम दहशतवादी आणि भारत विरोधी घोषित नव्हता झाला.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Ajit Pawar: अमित शहांनी तिढा सोडवला? अजित दादांच्या मागण्या मान्य, शरद पवार गटाचा नेता सुद्धा मंत्री?

दाऊद आणि करीम लाला या दोघांमध्ये त्या काळात मोठी भांडणं व्हायची. तो पठाणांकडून मुंबईच्या मुलींची होण्याऱ्या छेडछाडीविरुद्ध नेहमी तक्रार करायचा. मी दाऊदला भेटण्यासाठी माझ्या नवऱ्यालाही सोबत घेऊन गेले होते. मला काळ्या काचा असलेल्या गाडीमध्ये त्याला भेटण्यासाठी घेऊन गेले होते.

त्यादरम्यान छोटा शकील देखील तिथेच होता. मुलाखती दरम्यान तो जास्त वेळा हेच बोलला की करीम लाला वाईट माणूस आहे. ही आमची पहिली भेट होती. याची मी एक छोटी बातमी छापली होती. यानंतर मी त्याला नाही भेटले.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का, 17 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

मी गुजरात नेहमी जायचे. त्यावेळी गुजरात सरकारमधील गृहमंत्री प्रबोध रावल माझ्या पतींचे वर्गमित्र होते. मी त्यांची मदत मागितली आणि त्यांनी मला बडोदरा तुरुंगात एंट्री मिळवून दिली. मी तिकडे पाहिलं की दाऊद इब्राहीम फुटबॉल खेळत होता. माझं त्याच्याशी बोलणं देखील झालं. दाऊद मला म्हणाला की तो आलमला सोडणार नाही. मी या हेडलाईन सोबत चित्रलेखामध्ये लेख लिहिला. त्यानंतर त्याची हत्या झाली.(Latest Marathi news)

या घटनेनंतर क्राईम ब्रांचने मला अनेक प्रश्न विचारले आणि दाऊद इब्राहीम विरोधात मला साक्ष द्यायला लावली. त्यानंतर दाऊदसोबत २-३ वर्ष माझं बोलणं झाल नाही.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

दाऊद दहशतवादी कसा झाला?

दाऊदने अनेक गुन्हे केले. मात्र, त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक देश सोडून केली. ही चूक त्यांच्या अंताची सुरुवात होती. अटकेपासून वाचण्यासाठी तो मुंबईमधून पळून गेला आणि दुबईमध्ये राहू लागला. त्यानंतर एक गोष्ट छापली गेली की त्याने दुबईमध्ये बसून ड्रग्जची स्मगलिंग सुरु केली.त्यानंतर मी त्याला फोन केला आणि त्याला भेटायला दुबईला गेले. त्यावेळी मी माझी मॅगझिन अभियान चालवतं होते.

मी जेव्हा दुबईत गेले तेव्हा एका मित्राच्या मदतीने एक फोटोग्राफर घेतला. आम्ही पर्ल बिल्डिंग पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर फोटोग्राफरला जसं समजलं की मी दाऊदला भेटायला जात आहे, तो लिफ्ट उघडताच पळून गेला आणि कॅमेरा माझ्याकडे दिला.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Bacchu Kadu: बच्चू कडू मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर, पण...; सरकारमध्ये राहण्याबाबतही स्पष्ट केली भूमिका

मी दाऊदला भेटायला त्याच्या घरी पोहोचले. त्याने मुलाखत द्यायला नकार दिला. त्यावेळी हवाला ऑपरेटर छोटा राजन आणि अब्दुल्ला तिकडेच बसलेले होते. त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण मुलाखत काही दिली नाही. बोलताना त्यांनी ३ खुनांची गोष्ट मान्य केली. तो म्हणाला की,"मी जर त्यांना मारलं नसतं तर त्यांनी मला मारलं असतं"

शेवटी त्याने तिसऱ्या दिवशी मुलाखत दिली. मात्र, त्याने मुलाखत रेकॉर्ड करु दिली नाही. मी लिहितं गेले. त्यावेळी अब्दुल्ला देखील तिथेच बसला होता. त्याने सर्व सांगितलं की कोणते अधिकारी त्याचे मित्र आहेत,कोणते मंत्री त्याचे मित्र आहेत. विमानतळावर तो कोणाला ओळखतो.

दाऊदची मुलाखत घेतल्यावर मी मुंबईला परत आले. उतरताच दुसऱ्या दिवशी माझी डायरी चोरीला गेली, ज्यात मी दाऊद आणि माझ्यातील संभाषण लिहिलं होतं. त्यानंतर दाऊदशी माझं भांडण झालं.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Marathi News Update : मंत्रिमंडळ विस्तार अन् इतर राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

जेव्हा मी इंडिया टुडेमध्ये काम करत होते, तेव्हा मुंबईमध्ये ब्लास्ट झाला होता. त्यानंतर मी दाऊदशी संपर्क केला. तो त्यावेळी पाकिस्तानमध्ये होता. मी कराचीमध्ये जाऊन त्याची मुलाखत घेतली.

दाऊदने आत्मसमर्पणाचा प्रयत्न केला होता

माझं दाऊदसोबत पुन्हा बोलणं झालं. मी त्याला फूलनदेवीच्या आयुष्याबद्दल सांगितलं. अन्याय, अपराधापासून खासदार बनण्यापर्यंतची तिची कहाणी मी त्याला सांगितली. मी दाऊदला पाकिस्तानमधून बाहेर येऊन आत्मसमर्पण करायला सांगितलं. त्याने आत्मसमर्पणाचा प्रयत्नही केला, पण अपयश आले. दाऊदने लोकप्रिय वकील रामजेठमलानी यांच्याशी संपर्कही केला होता. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते.

Daud Ibrahim with Shila Bhutt
Sharad Pawar : ''तुम्हाला काय करायचं ते करा...'' सैतान प्रकरणावरुन सदाभाऊ खोत आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.