देशात बेरोजगारी घटली! मार्चमध्ये दर ७.६ टक्क्यांवर

सीएमआयईची आकडेवारी जाहीरमार्चमध्ये दर ७.६ टक्क्यांवर
unemployment in india
unemployment in indiasakal
Updated on

नवी दिल्ली : एकीकडे विरोधक देशात बेरोजगारी वाढल्याचे सांगत आंदोलन, मोर्चे काढत असताना कोरोनानंतर अर्थव्यवस्था पूर्ववत होत असल्याने बेरोजगारीचा दर घटत असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) यासंबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. जर देशात खरोखरच बेरोजगारी दरात घट होत असेल, तर ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

सीएमईईच्या दरमहा येणाऱ्या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचा दर फेब्रुवारीत ८.१० टक्के होता, जो मार्चमध्ये कमी होऊन ७.६ टक्क्यांवर आला. दोन एप्रिलला या प्रमाणात अधिक घट होऊन दर ७.५ टक्क्यांवर आला आहे. शहरी बेरोजगारीचा दर या महिन्यात ८.५ टक्के; तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ७.१ टक्के आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे माजी प्राध्यापक अभिरूप सरकार यांनी सांगितले, की बेरोजगारीचा दर घटत आहे, परंतु भारतासारख्या गरीब देशाच्या दृष्टीने हा दर बराच मोठा आहे. ते म्हणाले, की सध्याच्या बेरोजगारीच्या दरातील घट दर्शवते की कोविडनंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. ते पुढे म्हणाले, की ग्रामीण भागातील नागरिकांना बेरोजगारी झेपत नाही, त्यामुळे त्यांचे पोट भरेल इतका रोजगार जिथे कुठे उपलब्ध होईल ते तो स्वीकारतात.

सर्वाधिक बेरोजगारी हरियानात

आकडेवारीनुसार मार्चमध्ये हरियानामध्ये सर्वांत अधिक बेरोजगारी होती. येथे बेरोजगारीचा दर २६.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यानंतर राजस्थान (२५ टक्के), जम्मू-काश्मीरचा (२५ टक्के) क्रमांक लागतो. बिहारमध्ये बेरोजगारीचा

दर मार्चमध्ये १४.४ टक्के होता;

तर त्रिपुरामध्ये बेरोजगारीचा दर १४.१ टक्के होता. पश्चिम बंगालमध्ये हा दर ५.६ टक्के होता.

कर्नाटक, गुजरातमध्ये बेरोजगारीत घट

एप्रिल २०२१ मध्ये एकूण बेरोजगारीचा

दर ७.९७ टक्के होता. मागील वर्षी मे मध्ये हा दर ११.८४ टक्क्यांच्या उच्च स्तरावर पोहोचला होता. मार्च २०२२ मध्ये कर्नाटक (१.८ टक्के) आणि गुजरातमध्ये (१.८ टक्के) बेरोजगारीचा दर सर्वांत कमी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.