सावरकर पोस्टर वादावर इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ यांचा संताप; म्हणाले..

कर्नाटकात स्वातंत्र्यदिनीच सावरकरांच्या फ्लेक्सवरुन हिंसाचाराची घटना घडली यात एकाची हत्या झाली.
Vikram Sampath
Vikram Sampath
Updated on

बंगळुरु : भारत जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे त्याचवेळी सावरकरांच्या पोस्टरवरुन हिंसाचार होतोय हे दुर्देवी आहे, असं मत विधान इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ यांनी व्यक्त केलं आहे. कर्नाटकातील शिवमोंगा इथं स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच सावकरांच्या पोस्टरवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. (Unfortunate as we celebrate India @75 Vikram Sampath on Savarkar poster row in Karnataka)

Vikram Sampath
ज्योती मेटेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी

स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवमोंगा इथं एका गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फ्लेक्स हायमास्ट पोलवर लावायचा होता. पण दुसऱ्या एका गटानं या फ्लेक्सवर आक्षेप घेतला कारण त्यांना त्याच ठिकाणी टिपू सुलतानचा फ्लेक्स लावायचा होता.

Vikram Sampath
जर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही - कोर्ट

यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीची भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी आणि परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. दरम्यान, मंगळवारी कर्नाटक पोलिसांनी चार व्यक्तींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.