भारत गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पोलिओमुक्त झाला आहे. मात्र जगातील काही भागात अद्यापही पोलिओ रुग्ण सापडतात.
नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ जगभरात कोरोनाने (Covid 19) थैमान घातलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सध्या यावर लसीकरण (Vaccination) मोहिम वेगानं सुरु आहे. जगभरातील सर्वच देशांमध्ये लसीकरण सुरु झालं आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजुला कोरोना रुग्णांची संख्याही तितकीच वाढत असून मृत्यू दरातही वाढ होत आहे. लसीकरणाबाबत जनजागृती करताना युनिसेफने (UNICEF) म्हटलं की, लस आपल्याला पोलिओ (Polio) प्रमाणेच इतर व्हायरसपासून वाचवण्यात मदत करू शकते. युनिसेफ इंडियाने (UNICEF India) ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. यात वेगवेगळ्या आजारांविरुद्ध लसीने जगाला कसं वाचवलं हे युनिसेफनं सांगितलं आहे.
काय म्हटलंय व्हिडिओमध्ये?
गेल्या 100 वर्षांमध्ये प्राणघातक अशा आजारांपासून वाचवणाऱ्या अनेक लशींची यशस्वी निर्मिती मानवाने केली आहे. यामध्ये उदाहरणच द्यायचं असेल तर पोलिओ लशीचं देता येईल. गेल्या शतकात पोलिओने जगाला ग्रासले होते. हजार लोकांमागे शंभर जणांना तरी याची लागण व्हायची. यामध्ये शरीराचे अवयव निकामी होत असत. लहान मुलांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक होतं. वयस्क लोकांनाही पोलिओचा धोका असायचा. 1950 मध्ये दोन लशींचा शोध लागला. तेव्हापासून सर्वच देश जगातून पोलिओचा नायनाट करण्याासाठी एकत्र काम करत आहेत. लसीकरण मोहिमेंतर्गत कोट्यवधी मुलांना लसीकरण केलं जातं. आज त्यांचे धन्यवाद ज्यांनी लसीकरणासाठी पाऊल उचललं आणि हर्ड इम्युनिटी तयार झाली. आज जग जवळपास पोलिओमुक्त झालं आहे.
पोलिओ किंवा पोलिओमेलाइटिस हा व्यक्तीला अपंग करणारा असा आजार आहे. पोलिओ व्हायरसमुळे हा आजार होतो. पोलिओची लागण झालेल्या व्यक्तीच्या डोक्यासह पाठीच्या मणक्यावर परिणाम करतं. यामुळे पक्षाघाताचा धोका असतो. पक्षाघात झाल्यास व्यक्तीला हालचाल करणं कठीण होतं. यामध्ये अपंगत्वही येऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटना आणि देशांच्या सहकार्याने पोलिओवर लसीकरण मोहिम जगभरात सुरु करण्यात आली आणि जगाला पोलिओपासून वाचवलं. भारत गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पोलिओमुक्त झाला आहे. मात्र जगातील काही भागात अद्यापही पोलिओ रुग्ण सापडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.