Uniform Civil Code : समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मिळालं मोठं समर्थन! लवकरच कायदा होणार लागू?

Uniform Civi Code aam aadmi party support pm modi bjp govt over Uniform Civi Code
Uniform Civi Code aam aadmi party support pm modi bjp govt over Uniform Civi Code
Updated on

समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सध्या देशात वाद पेटला आहे. यामुद्द्यावर मोदी सरकारने आम आदमी पक्षाकडून मोठं समर्थन मिळालं आहे. AAP चे संघटन महासचिव संदीप पाठक यांनी 'आज तक' यावृत्तवाहिनीशी बोलताना आम आदमी पार्टी समान नागरी कायद्याचे तत्वतः समर्थन करते अशी माहिती दिली आहे.

संदीप पाठक यांनी सांगितले की, आर्टिकल ४४ मध्ये देखील समान नागरी कायदा असावा असं सांगितलं आहे, मात्र आपचे म्हणणे आहे की, या मुद्द्यावर सर्व धर्म आणि राजकिय पक्षांमध्ये चर्चा झाली पाहिजे. तसेच सर्वांच्या सहमतीनेच हा कायदा लागू केला जाावा.

त्यांनी समान नागरी कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावर भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केली आहे. ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे की जेव्हा निवडणूका येतात तेव्हाच ते गुंतागुंतीचे आणि अवघड मुद्दे समोर घेऊन येतात.

Uniform Civi Code aam aadmi party support pm modi bjp govt over Uniform Civi Code
KCR in Maharashtra : 'पांडुरंग खोक्यांकडेच नाही तर तेलंगणाच्या बोक्यांकडे देखील लक्ष ठेवून…'; ठाकरे गटाचा टोला

पाठक पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचा यूसीसी लागू करणे आणि हा प्रश्न निकाली काडण्याशी काहीही संबंध नाहीये. भाजप फक्त स्टेट ऑफ कन्फ्यूजन तयार करते. जेणेकरून देशात फूट पाडता येईल आणि निवडणूका जिंकता येतील. पंतप्रधान मोदींनी मागचे ९ वर्ष काम केलं असतं तर त्यांना कामाचा आधार असता, पण पंतप्रधानांना कामाचा आधार नाहीये, म्हणून ते UCC चा आधार घेत आहेत.

Uniform Civi Code aam aadmi party support pm modi bjp govt over Uniform Civi Code
FIR Against BJP IT Cell chief : राहुल गांधींविरोधात ट्वीट भोवलं! भाजप आयटी सेल प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल

समान नागरी कायदा काय आहे?

समान नागरी कायद्याअंतर्गत सर्व धर्मांसाठी एकच कायदा व्यवस्था असणार आहे. सध्या प्रत्येक धर्माचा पर्सनल लॉ आहे, ज्याअंतर्गत लग्न, घटस्फोट आणि संपत्तीसंबंधी वेगवेगळे कायदे आहेत. समान नागरी कायदा लागू केल्यास सर्व धर्म पाळणाऱ्या नागरिकांची प्रकरणे सिव्हील नियमांतर्गत सोडवले जातील. समान नागरी कायदा लागू केल्यास लग्न, घटस्फोट, दत्तक घेणे, उत्तराधिकारी आणि संपत्तीचा अधिकार यासंबंधिच्या कायदे सर्वांसाठी एकच असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.