Union Budget 2023 : ८० कोटी जनतेसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; मिळणार मोफत धान्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.
Union Budget 2023
Union Budget 2023
Updated on

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, सीतारामन यांनी 80 कोटी लोकांना दिलासा देताना मोठी घोषणा केली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. (Union Budget 2023 Nirmala Sitharaman people will get free food grains for one year)

आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना जानेवारी 2024 पर्यंत मोफत धान्य दिले जाईल.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, कोरोना महामारी दरम्यान लोकांना मदत करण्यासाठी मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले होते, नंतर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आले.

Union Budget 2023
Budget 2023: गेल्या ५ वर्षीतील देशाच्या विकास दराची स्थिती, जाणून घ्या

जाणून घ्या या योजनेअंतर्गत कोणाला मिळते मोफत धान्य

  • योजनेंतर्गत गरिबांना पक्के घर नसावे.

  • स्वतःची जमीन नसावी.

  • म्हैस/बैल/ट्रॅक्टर/ट्रॉली नसावी.

  • निश्चित व्यवसाय नसावा.

  • कुक्कुटपालन/गाई पालन इत्यादी नसावेत.

  • कोणताही आर्थिक सहाय्य व्यवसाय किंवा सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत नसावी.

  • वीज कनेक्शन नसावे.

  • असे लोक पात्र ठरणार नाहीत ज्यात एक सदस्य देखील आयकरदाता आहे.

  • अशी कुटुंबे पात्र नाहीत, ज्यांच्याकडे चारचाकी किंवा ट्रॅक्टर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.