केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर केले. यादरम्यान, त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकरी आणि आयकरच्या रचनेत बदलसंदर्भात सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Union Budget 2023 pm Nnarendra Modi first reaction)
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना संबोधित करताना अर्थमंत्री सीतारामन यांचे अभिनंदन केले. तसेच, त्याचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही आभार मानले.
मोदी म्हणाले, आम्ही तंत्रज्ञानावर खूप भर दिला आहे. अर्थसंकल्पात वंचितांना प्राधान्य देण्यात आल्याचेही मोदींनी सांगितले. महिलांसाठीही विशेष बजेट जाहिर करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या विकासाला नवी गती देईल, असे पंतप्रधान म्हणाले. तसचे, या अर्थसंकल्पात एमएसएमईचीही काळजी घेण्यात आली असून पेमेंटची नवी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात वंचितांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प आजच्या महत्त्वाकांक्षी समाजाची, गावांची, गरीबांची, शेतकरी आणि मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण करेल. असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
आमच्या महिलांच्या राहणीमानात खेड्यापासून शहरांपर्यंत बदल घडवून आणण्यासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. त्यांना आता अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल. "या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच देशाने अनेक प्रोत्साहन योजना आणल्या आहेत. अशा लोकांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान, क्रेडिट आणि मार्केट सपोर्टसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
यासोबतच, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प कोट्यावधी नागरिकांचे आयुष्य बदलेल. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल आहे. ग्रामीण शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल. शेतकऱ्यांना सक्षम बनवणाला अर्थसंकल्प आहे. बजेट गरिबांच स्वप्न पुर्ण करणार. असा विश्वास व्यक्त करताना प्रत्येक क्षेत्रात आपण अधुनिकतेची कास धरायला हवी. असे आवाहनदेखील त्यांनी नागरिकांना दिले. अर्थसंकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम करणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.