Union Budget 2023 : बजेटच्या दिवशी चर्चा फक्त क्रिकेटची; हा चमत्कार फक्त देवामुळे घडला!

रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या या बजेटची सगळ्या देशात हवा होती.
Union Budget 2023
Union Budget 2023 esakal
Updated on

देशाचा अर्थसंकल्प जाहीर होत असून कोणत्या क्षेत्रावर सरकारची कृपादृष्टी झालीय हे पाहण्यात सर्वांना उत्सुकता असते. त्यामुळे टीव्ही, मोबाईलवर बजेट पाहुनही लोक वृत्तपत्रात सविस्तर येणारे वृत्त वाचतातच. पण, अर्थसंकल्पाच्या इतिहासात एक दिवस असाही उगवला होता की जेव्हा वृत्तपत्रात येणारी बातमी वाचायला कोणालाही रस नव्हता.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर तो नकारात्मक होता. किंवा तो जाहीर झाल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या. असे काहीही नसताना वृत्तपत्रात अर्थसंकल्पाला दुसऱ्या पानावर स्थान देण्यात आले होते. याचे कारण होते भारताच्या एका क्रिकेटरने केलेली कामगिरी.

Union Budget 2023
Union Budget 2023 : बजेटबरोबरच चर्चा अर्थमंत्र्यांच्या लाल साडीची, या राज्याशी आहे खास नातं

दिवस होता २४ फेब्रुवारी २०१०. हो दिवस भारतीय क्रिकेट आणि बजेटच्या इतिहासात खास मानला जातो. या दिवशी दुपारपर्यंत देशात एकच चर्चेचा विषय होता तो म्हणजे रेल्वे बजेट. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या या बजेटची सगळ्या देशात हवा होती. दुपारपर्यंत याच बातम्या स्क्रोल होत होत्या.

Union Budget 2023
Union Budget 2023:कमी होतील का सिनेमांच्या तिकिटांचे दर?स्वस्त होणार का OTT प्लॅटफॉर्म? विश्लेषक म्हणतायत..

पण, दुपारनंतर चित्र पालटलं. जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने विश्वविक्रम केला होता. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. सचिनने ग्वाल्हेरमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद २०० धावा केल्या होत्या.

Union Budget 2023
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू

या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने वृत्तपत्रांच्य पहिल्या पानावर सचिनला स्थान मिळाले. तर, अर्थसंकल्प मागच्या पानावर छापण्यात आला. द्विशत पुर्ण केल्यावर आकाशाकडे पाहणारा सचिन सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकला.                                

Union Budget 2023
Union Budget 2022: 'Whatsapp, Facebookवर ऊसाची, गव्हाची शेती करता येत नाही'; पाहा व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या सामन्यात 3 गडी गमावत 401 धावा केल्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या (114*) शतकी खेळीनंतरही विरोधी संघ 42.5 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला. श्रीसंतने सर्वाधिक 3 तर आशिष नेहरा, रवींद्र जडेजा आणि युसूफ पठाण यांनी 2-2 विकेट घेतल्या. सचिनने वैयक्तिक 200 धावा करताच ग्वाल्हेरमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष सुरू केला. २०१० मध्ये झालेला वनडे सामना सचिनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरला होता.  

Union Budget 2023
Sachin Tendulkar : 'आक्रमक' कसोटी क्रिकेटच्या पाठीराख्यांना सचिनने लगावला अप्रत्यक्ष टोला

यानंतर पुन्हा एकदा असा सुवर्णयोग घडून आला होता. १६ मार्च २०१२ मध्ये एशिया कपमध्ये भारताची मॅच होती बांगलादेश विरुद्ध सामना होता. योगायोगाने त्याच दिवशी बजेट जाहीर होणार होते.   हा सामनाही महत्वाचा होता कारण या दिवशी सचिन आपले १०० वे शतक पूर्ण केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()