Union Budget 2024 : भाषणावर आंध्र, बिहारचा वरचष्मा

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि अर्थमंत्री या नात्याने सलग सातवा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये मांडला.
Union Budget 2024
Union Budget 2024sakal
Updated on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि अर्थमंत्री या नात्याने सलग सातवा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये मांडला. आंध्रप्रदेश आणि बिहार केंद्रित घोषणांमुळे विरोधी बाकांवरून ‘कुर्सी बचाओ बजेट’ अशी झालेली शेरेबाजी आणि अर्थसंकल्पातील घोषणांनिहाय सत्ताधाऱ्यांकडून तब्बल ७२ वेळा वाजवून झालेले स्वागत या सभागृहातील उल्लेखनीय बाबी ठरल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून अर्थसंकल्पाची माहिती दिली.

त्यानंतर संसद भवनाच्या आवारात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर अंतिम हात फिरविण्यात आला. त्यानंतर सभागृहात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे भाषण केले. जांभळ्या काठाची ऑफ व्हाईट रंगाची म्हैसूर सिल्क साडी परिधान केलेल्या निर्मला सीतारामन यांनी पारंपरिक चोपडीमध्ये गुंडाळून डिजिटल अर्थसंकल्प संसदेत आणला होता. सभागृहामध्ये त्यांनी टॅबलेटवर भाषण वाचले.

आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अर्थसंकल्पी भाषणांमध्ये शेरोशायरी, काव्यपंक्ती अथवा सुभाषिते तसेच महनीय व्यक्तींच्या वचनांचा उल्लेख करण्याची परंपरा राहिली आहे. मात्र, आजचे अर्थसंकल्पी भाषण याला अपवाद होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असा कोणताही उल्लेख करण्याचे टाळले. काही महिन्यांपूर्वीच हंगामी अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला असल्याने नव्या अर्थसंकल्पाचे भाषणही तुलनेने छोटेखानीच राहिले.

तमिळनाडू, केरळचे सदस्य अस्वस्थ

बिहार, आंध्रप्रदेशसाठी झालेल्या घोषणांमुळे अस्वस्थ झालेले द्रमुकचे खासदार दयानिधी मारन, कनिमोळी हे तामिळनाडूसाठी तर, के. सी. वेणुगोपाल आणि के. सुरेश हे केरळमधील काँग्रेस खासदार आपापल्या राज्यांसाठी अर्थसंकल्पात काय? अशी विचारणा करताना दिसले. तुलनेने सत्ताधारी बाकांवर जेडीयू आणि तेलुगू देसमच्या खासदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक घोषणेचे मोदी आणि मंत्रिमंडळातील सहकारी स्वागत करताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.