Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw sakal

IT हार्डवेअरसाठी 17,000 कोटी रुपयांच्या PLI योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Published on

केंद्र सरकारने बुधवारी IT हार्डवेअरसाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (PLI)-0.2 ला मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 17,000 कोटी रुपये मंजूर केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 17,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चासह IT हार्डवेअरसाठी PLI योजनेला मंजुरी दिली आहे. कार्यक्रमाचा कालावधी सहा वर्षांचा आहे," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

75000 लोकांना मिळेल रोजगार

अश्विनी वैष्णव म्हणाले की या प्रोत्साहन योजनेतून 3.35 लाख कोटी रुपयांची निर्मिती आणि 2,430 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून 75,000 लोकांना थेट रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेतून विस्ट्रॉन कॉर्प, डिक्सन आणि फॉक्सकॉन सारख्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांना देखील फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Ashwini Vaishnaw
Vande Bharat : राज्यातील 'वंदे भारत' ट्रेन ठरली पांढरा हत्ती! आठ डबे कमी करण्याची नामुष्की

यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये, सरकारने IT हार्डवेअरसाठी PLI योजना मंजूर केली होती. ज्यात लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी आणि सर्व्हरच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले होते, ज्याचा अर्थसंकल्पीय खर्च 7,350 कोटी रुपये होता.

Ashwini Vaishnaw
Sameer Wankhede News : समीर वानखेडे सीबीआयच्या रडारवर! उद्या पुन्हा होणार चौकशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()