देशात पुन्हा कोरोनाची धास्ती; आरोग्य मंत्रालयाने घेतली महत्वपूर्ण बैठक

Mansukh Mandviya
Mansukh MandviyaMansukh Mandviya
Updated on

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र यातच काही युरोपियन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी जगभरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे. या दरम्यान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्च स्तरीय अधिकांऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना संबंधी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय बैठकीत 27 मार्चपासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा सरकारच निर्णय घेण्यात आला असून सोबतच कोरोना बाबत काळजी घेत लसीकरण आणि जीनोमिक सिक्वेंनसिंग यासारख्या बाबींवर भर देण्यात आला. तसेच बैठकीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोविड19 लसीकरण कार्यक्रम आणि 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेतला.

दरम्यान चीन, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि काही युरोपीय देशांमध्ये वाढती प्रकरणे पाहता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ञांसह झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांनी जीनोमिक सिक्वेन्सिंग, तपासण्यांमध्ये वाढ आणि अत्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत, असे एका अधिकृत सूत्राने सांगितले.

Mansukh Mandviya
'द काश्मिर फाईल्स' महाराष्ट्रात करमुक्त नाहीच; अजित पवार म्हणाले..
Mansukh Mandviya
TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

आरोग्य सचिव राजेश भूषण, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, फार्मास्युटिकल्स विभागाचे सचिव एस अपर्णा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि डॉ. NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष एनके अरोरा या बैठकीला उपस्थित होते.

Mansukh Mandviya
एलन मस्कचं थेट पुतीन यांना 'वन-ऑन-वन' युध्दाचं आव्हान, म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.