'वैज्ञानिक तथ्यांच्या आधारेच वाढवलं दोन डोसमधील अंतर'

'वैज्ञानिक तथ्यांच्या आधारेच वाढवलं दोन डोसमधील अंतर'
Updated on

नवी दिल्ली: लसींच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयावरुन बराच गोंधळ समोर आला आहे. वैज्ञानिकांच्या सहमतीशिवायच दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सल्लागार समितीच्या तीन सदस्यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली होती. मात्र, या संदर्भातील स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी तसेच NTAGI चे सदस्य असलेल्या डॉ. जयप्रकाश मुलीयील यांनीही दिलं आहे.

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विट करत म्हटलंय की, वैज्ञानिक आकडेवारीच्या आधारे #COVISHIELD च्या दोन डोसच्या दरम्यानचे अंतर वाढविण्याचा निर्णय पारदर्शक पद्धतीने घेण्यात आला आहे. डेटाचे मूल्यांकन करण्यासाठी भारताकडे एक मजबूत यंत्रणा आहे. दुर्दैवाने अशा महत्त्वाच्या विषयाचे राजकारण केले जात आहे!

National Technical Advisory Group on Immunization (NTAGI) च्या कोअर ग्रुपचे सदस्य असलेले एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. जयप्रकाश मुलीयील यांनी म्हटलंय की, यामध्ये कसलाही वाद नाहीये. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णयावर आमच्या सर्वांचीच सहमती होती.

आरोग्य मंत्रालयाने १३ मे रोजी कोव्हिशिल्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरुन १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी देशात लसींचा तुटवडा होता. मागणी इतका लसींचा पुरवठा होत नव्हता आणि देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाणही जास्त होते.

NTAGI च्या १४ वैज्ञानिकांपैकी तिघांनी अशी शिफारस करण्यासाठी पुरेसे पुरावेच नसल्याचे सांगितलं होतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम.डी. गुप्ते म्हणाले की, "NTAGI दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवड्यांनी वाढवण्याचे समर्थन केले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा दोन डोसमध्ये इतके अंतर ठेवण्याचा सल्ला दिला होता." पण १२ आठवड्यांनंतर लस दिल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचा डाटा वैज्ञानिकांकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

"आठ ते बारा आठवडे आम्ही मान्य केलं. पण १२ ते १६ आठवडे हे अंतर सरकारकडून आलं आहे. हे योग्य सुद्धा असेल किंवा नसेल सुद्धा. त्या बद्दल आमच्याकडे माहिती नाही" असे गुप्ते यांनी सांगितलं. NTAGI मधील गुप्तेंचे सहकारी मॅथ्यू वर्गीस यांनी सुद्धा सहमती दर्शवली. वैज्ञानिकांच्या गटाने आठ ते १२ आठवड्यांची शिफारस केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.