नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. निव्वळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगातच कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. सध्यातरी कोरोना संसर्गावर कसल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाहीये. मात्र, वेगवेगळ्या देशांनी लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. भारतात देखील १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. आतापर्यंत ५० कोटींच्या वर डोस दिले गेले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन या लशीला नुकतीच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात पाच लशी उपलब्ध झाल्या आहेत. भारतात लसीकरण झालेल्या व्यक्तीला तत्काळ कोविन पोर्टलवरुन लस प्रमाणपत्र प्राप्त होते. मात्र, आता हे लस प्रमाणपत्र मिळणं आणखी सोपं होणार आहे. नेहमी संपर्कासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सऍपवर आता अवघ्या काही सेंकदात लस प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत म्हटलंय की, तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाच्या जीवनात क्रांती घडवत आहोत!
आता कोरोना लस प्रमाणपत्र आपल्याला MyGov Corona Helpdesk वरुन अवघ्या काही क्षणात मिळणार आहे. तीन सहजसोप्या स्टेप्सनंतर आपल्याला हे प्रमाणपत्र मिळेल.
हा संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा : +91 9013151515
त्या क्रमांकावर 'covid certificate' असं टाईप करुन पाठवा
त्यानंतर आलेला ओटीपी टाका
अवघ्या काही सेकंदात आपल्याला आपलं लस प्रमाणपत्र प्राप्त होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.