राहुल बाबा.. इटालियन चष्मा काढा, तरच विकास दिसेल; अमित शाहांनी उडवली खिल्ली

Amit Shah vs Rahul Gandhi
Amit Shah vs Rahul Gandhiesakal
Updated on
Summary

केंद्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून ईशान्येत 9,000 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सध्या अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ते नामसाई जिल्ह्यात पोहोचले. इथं त्यांनी 1000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजप सरकार अरुणाचलच्या पाठीशी नेहमीच उभं राहील, असं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही (Rahul Gandhi) प्रहार केला.

यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधत म्हटलं, काँग्रेस नेते विचारतात की 8 वर्षांत काय झालं? हे लोक डोळे मिटून बसले नाहीत. राहुल बाबांनी आपला इटालियन चष्मा काढून पीएम मोदी आणि सीएम पेमा खांडू यांनी केलेली विकासकामं पाहावीत, असा टोला त्यांनी लगावलाय.

Amit Shah vs Rahul Gandhi
प्रकाश आंबेडकरांना ED ची नोटीस; म्हणाले, ### दम असेल तर मला उचलून दाखवा

अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तिराप जिल्ह्यातील (Tirap District) नरोत्तम नगरमधील रामकृष्ण मिशन स्कूलच्या (Ramakrishna Mission School) सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील आंतरराज्य सीमा विवाद (Arunachal Pradesh and Assam Border Dispute) यावर्षी मिटण्याची शक्यता आहे. संपूर्ण ईशान्येकडील भाग दहशतवादमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.

Amit Shah vs Rahul Gandhi
राज ठाकरेंनी जिंकलं मनसैनिकांचं 'मन'; 'त्या' चौघांना थेट नेत्यांच्या शेजारीच बसवलं!

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून आठ वर्षांत ईशान्येत 9,000 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत कायदामंत्री किरेन रिजिजूही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढं म्हणाले, 'आसाम आणि मेघालय यांच्यातील सुमारे 60 टक्के आंतरराज्य सीमा विवाद सामंजस्यानं सोडवण्यात आले आहेत. मला खात्री आहे की, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील वादही 2023 पूर्वी मिटतील. दोन्ही सरकार या दिशेने काम करत आहेत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()