भुनवेश्वर/कटक : ‘‘ओडिशात अखेर अच्छे दिन आले आहेत. देशातील प्रमुख पदांवर आता ओडिशातील अनेक व्यक्ती विराजमान आहेत. भविष्य आशादायी दिसत आहे. विकास कार्यासाठी मोठा वाव आहे. मी ओडिशाच्या उज्ज्वल भवितव्याची कल्पना करू शकतो,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केले.
कटक येथील दैनिक ‘प्रजातंत्र’च्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. जय जगन्नाथाचा घोष करीत शहा म्हणाले, ‘‘जेव्हा जेव्हा मी उत्कलच्या भूमीत असतो, तेव्हा मी प्रथम जगन्नाथाचे दर्शन घेतो. भारताच्या संसद विभागात प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधित्व असे. पण त्यात एक उणीव होती, ती म्हणजे त्यात एकही आदिवासी महिलेला स्थान नव्हते. आज ओडिशा कन्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. याबद्दल सर्व गरीब व आदिवासी जनतेला अभिमान वाटत आहे.
शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान रविवारी (ता.७) रात्री भुवनेश्वरला पोहोचले. श्रावणी सोमवारनिमित्त त्यांनी लिंगराज मंदिरात पूजा करून दौऱ्याला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कटक येथील जन्मस्थळाला भेट दिली. येथे दोन्ही नेत्यांनी तिरंगा यात्रेतही भाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.