कोलकातामधील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळलाय.
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या काही तास आधी कोलकात्यात (Kolkata) भाजप कार्यकर्त्याच्या हत्येवरून राजकारण तापलंय. अमित शहांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली असून बंगाल सरकारकडून अहवालही मागवलाय. भाजप युवा मोर्चाचा (BJP Yuva Morcha) कार्यकर्ता अर्जुन चौरसिया (Arjun Chaurasia) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच्या घराजवळ संशयास्पद स्थितीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अर्जुन चौरसिया हा आज कोलकाता इथं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी बाइक रॅलीचं नेतृत्व करणारा होता. तृणमूल काँग्रेसनं त्यांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप भाजपनं केलाय. मात्र, टीएमसीनं हा आरोप फेटाळून लावलाय.
कोलकाता इथं अर्जुन चौरसियाच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, या हत्येतील कोणत्याही आरोपींना सोडलं जाणार नाही. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या अशा राजकीय हिंसाचाराबद्दल गृह मंत्रालय चिंतेत असून मी राज्य सरकारकडून अहवाल मागवलाय. दरम्यान, भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर अमित शहांनी त्यांच्या स्वागताशी संबंधित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
भाजपच्या बंगाल युनिटनं एका ट्विटमध्ये लिहिलंय, 27 वर्षीय अर्जुन चौरसिया हा भारतीय युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होता. उत्तर कोलकात्यामध्ये त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आलीय. गेल्या वर्षी भाजपच्या 57 कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. टीएमसीनं मानवतेचा गळा घोटला आहे, असं त्यांनी नमूद केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.