योजना आवडत नसेल तर...; माजी लष्करप्रमुखांनी आंदोलकांना सुनावलं

Agneepath Scheme News
Agneepath Scheme News
Updated on

Agnipath Scheme : सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशभरात गदारोळाचे वातावरण आहे. तरूण आंदोलन करत आहेत तर विरोधकही केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने पलटवार सुरू आहे. आता केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही.के. सिंग (VK Singh) यांनी आंदोलकांना खडे बोल सुनावले आहेत. (union minister and former army chief vk singh statement on agnipath scheme)

माजी लष्करप्रमुख म्हणाले की, येथे आमची कोणतीही सक्ती नाही, ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे. तुम्हाला अग्निपथ योजना आवडत नसेल तर येऊ नका. कोण म्हणतंय यायला, तूम्ही बसेस जाळत आहात, ट्रेन जाळत आहात, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही तुला सैन्यात घेऊ, असा सवाल त्यांनी हिंसक निदर्शने करत असलेल्या तरूणांना केला आहे.

व्ही.के सिंग पुढे म्हणाले की, माझा विश्वास आहे की जर कोणी 4 वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर सक्षम ठरतो आणि त्याला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. लष्कर हे रोजगाराचे साधन नाही. हे दुकान किंवा कंपनी नाही. जो कोणी सैन्यात भरती होतो तो स्वेच्छेने तिथे जातो. ही एक ऐच्छिक योजना आहे. ज्यांना यायचे आहे ते येऊ शकतात. तुम्हाला कोण या म्हणतंय? तुम्ही बस आणि ट्रेन जाळत आहात, कोणी म्हणाले तुम्हाला सैन्यात घेणार? आधी आमचे मापदंड तरी पूर्ण करा , असे देखील ते तरूणांना म्हणाले आहेत.

अग्निपथ योजना मागे घेणार नाही - लष्कराचे स्पष्टीकरण

विशेष म्हणजे, सशस्त्र दलात भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या विरोधात देशाच्या विविध भागांत निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि बस ट्रेन गाड्या पेटवण्यात आल्या. या योजनेबाबत आज तिन्ही लष्कराच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. ज्यामध्ये अग्निपथ योजना मागे घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. आता या योजनेअंतर्गतच सैन्यात भरती होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()