Unknown Facts About Aghori Baba : प्रयागराजमध्ये सध्या माघ मेळा सुरु आहे. यात कोणीही अघोरी बाब किंना नागा बाबा येत नसूनही चर्चा मात्र त्यांच्याच रंगतात.
अघोरींची साधना पद्धती फार वेगळी असते. त्यामुळे त्यावरून बऱ्याच चर्चा होत असतात. कारण त्यांच जीवन, राहणीमान आणि ते जे काही करतात यासगळ्याच गोष्टी रहस्यमय असतात.
अघोरी बाबा म्हणताच अंगाला राख फासलेले बाबा लोकांचे रुप समोर येते. अघोरीचा संस्कृत अर्थ प्रकाशाच्या दिशेने असा होतो. या शब्दाला पवित्रता आणि सगळ्या वाईट गोष्टींपासून मुक्त असे समजले जाते.
पण याच्या अगदी वेगळं या लोकांच राहणं आणि दिसणं असतं. त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया.
माणसांचं कच्च मांस खातात
बऱ्याच इंटरव्ह्युव्हज, डॉक्युमेंट्रीजमध्ये अघोरींनी ही गोष्ट स्वतः मान्य केली आहे की, ते माणसांचं कच्च मांस खातात.
सामान्यतः हे अघोरी स्मशानाजवळ राहतात. आणि अर्धवट जळालेल्या प्रेतांचं मांस खातात. यामागे त्यांच म्हणणं असतं की, असं केल्याने त्यांची तंत्र शक्ती वाढते. सामान्य लोकांना जे बीभीत्स वाटतं ते या लोकांसाठी साधनेचा भाग असतो.
शिव आणि शवाचे उपासक
अघोरी लोक स्वतःला पुर्णपणे शवात विलीन करण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाच्या पाच रुपांपैकी एक अघोर हे रुप असतं. शिवाची उपासना करण्यासाठी अघोरी शवावर (प्रेतावर) बसून साधना करतात.
शवापासून शिवाची प्राप्ती हा रस्ता अघोरी लोकांचं चिन्ह आहे. हे अघोरी ३ प्रकारची साधना करतात. हे लोक प्रेताला मांस आणि दारूचं नैवेद्य दाखवतात. शिव साधनेत प्रेतावर एका पायावर उभं राहून साधना केली जाते. आणि स्मशानात हवन केलं जातं.
प्रेतासोबत शारीरिक संबंध
ही प्रचलीत धारणा आहे की, अघोरी साधू प्रेतांसोबत शारीरिक संबंध ठेवतात. ही गोष्ट अघोरीसुध्दा मान्य करातात. या मागच कारण ते शिव-शक्तीची उपासना करण्याचा मार्ग असल्याचं सांगतात.
त्यांचं म्हणणं असतं की, उपासना करण्याचा हा सगळ्यात सोपा प्रकार आहे. बीभित्सतेतच ईश्वराप्रती समर्पण होऊ शकतं. ते मानतात की, जर शवासोबत शारीरिक संबंध ठेवतानाही मन जर ईश्वर साधनेत लीन झालं तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते.
फक्त प्रेतच नाही तर जिवंत महिलांसोबतही ठेवतात संबंध
इतर साधूंप्रमाणे हे ब्रह्मचार्याचं पालन करत नाहीत. उलट प्रेतावर राख फासून मंत्र उच्चार आणि ढोल नगाडे वाजवत शारीरिक संबंध ठेवले जातात. ही प्रक्रिया त्यांच्या साधनेचा भाग आहे असं ते मानतात. विशेषतः महिलेची मासिक पाळी सुरू असेल त्यावेळी संबंध ठेवल्याने अघोरींची शक्ती वाढते असे ते मानतात.
शिवामुळे बाळगतात कवटी
जर तुम्ही अघोरी लोकांचे फोटो बघितले असतील तर तुम्ही हे ऑब्झर्व्ह केलं असेल की, त्यांच्या जवळ कायम कवटी असते. अघोरी लोक या मानवी कवटीचा वापर भोजन पात्र म्हणून वापर करतात. त्यामुळेच त्यांना कापालिक म्हणतात. असं म्हणतात की, ही प्रेरणा त्यांना शिवाकडून मिळाली आहे.
कुत्रा का पाळतात?
अघोरींना कुत्र्यांविषयी फार प्रेम असतं. गाय, बकरी, माणूस सगळ्याच प्राण्यांपासून दूर राहणारे हे अघोरी कुत्रा मात्र पाळतात. आपल्या आसपास कुत्रा बाळगतात.
प्रत्येक माणूस अघोरी
अघोरी लोकांचं माननं आहे की, प्रत्येकच व्यक्ती जन्माला येतो तो अघोरी म्हणूनच. जसं नवजात बालकाला घाण आणि अन्न यात काही फरक कळत नाही, तसंच अघोरी सुध्दा घाण आणि चांगलं याला एकाच नजरेने बघतात.
त्यांच्यकडे एड्स आणि कँसरवर आहे उपचार
बऱ्याच अघोरींचं म्हणणं असतं की, त्यांच्याकडे एड्स आणि कँसरवर पण उपचार आहे. पण याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. पण तरीही त्यांच म्हणणं आहे की, शवाच्या शरीराचं तेल काढून ते मोठ्यातला मोठा आजार बरा करू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.