Unnao Accident: स्लीपर बस टँकरला धडकली, 18 जण ठार; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Unnao Bus Tanker Accident: मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बिहारमधील शिवगढहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसची एका टँकरला धडक बसली.
Unnao Bus Tanker Accident
Unnao Bus Tanker AccidentEsakal
Updated on

उन्नाव जिल्ह्यात बुधवारी सकाळी बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बिहारमधील शिवगढहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसची एका टँकरला धडक बसली.

ही धडक एवढी जोरदार होती की, बस आणि टँकरचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन महिला आणि एका बालकासह 18 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सुमारे 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून, त्यांनी मदतकार्याला सुरुवात करत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या दुधाच्या टँकरला पहाटे 05:15 च्या सुमारास धडकल्याने 18 जणांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल केले. बेहता मुजावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती देताना उन्नावचे जिल्हाधिकारी गौरांग राठी म्हणाले, "आज पहाटे 05.15 च्या सुमारास मोतिहारी, बिहार येथून येणारी खासगी बस दुधाच्या टँकरला धडकली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जण जखमी झाले आहेत." प्राथमिक तपासात बसचा वेग खूप जास्त होता असे दिसत आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ता अपघाताची दखल घेतली आहे आणि मृतांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Unnao Bus Tanker Accident
Puri Rath Yatra: पुरी रथ यात्रेदरम्यान अपघात! भगवानाची मूर्ती अंगावर पडून 9 जण जखमी; Video

मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. ट्रॅव्हल कंपनीमार्फत बुक केलेल्या तिकिटांच्या आधारे मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त बस आणि टँकर रस्त्यावर उलटल्याने आग्राच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटर लांब जाम जाम झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.