MP High Court: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

MP High Court: भारतात 'वैवाहिक बलात्कार' हा गुन्हा म्हणून ओळखला जात नाही, असे नमूद करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, पत्नीसोबत पुरुषाने केलेला अनैसर्गिक संभोग यासह कोणतेही लैंगिक संबंध हे बलात्कार ठरत नाहीत
Unnatural sex with wife is not rape
Unnatural sex with wife is not rapeesakal
Updated on

MP High Court : पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रकरणी मध्ये प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांनी आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही.

नरसिंगपूरच्या एका पीठाने कलम 377 आणि 506 अंतर्गत पतीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. भारतात वैवाहिक बलात्कार (मॅरिटल रेप) गुन्हा मानला जात नाही असं सांगत उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

पत्नीने लावला होता अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा आरोप-

मे 2019 मध्ये नरसिंगपूर येथे राहणाऱ्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी 2020 पासून तिच्या माहेरच्या घरी आहे. यावेळी पत्नीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता, जो प्रलंबित आहे. पतीने घटस्फोटाची मागणी करणारा अर्ज जबलपूर येथील कौटुंबिक न्यायालयातही दाखल केला आहे.

पत्नीने पतीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा आरोप देखील केला. या प्रकरणी जुलै 2022 मध्ये नरसिंगपूर येथे एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण कोतवाली पोलीस स्टेशन, जबलपूर येथे वर्ग करण्यात आले होते. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध कलम 377 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की वादानंतर त्याने अनैसर्गिक पद्धतीने महिलेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. मात्र पत्नीने यापूर्वी दाखल केलेल्या हुंड्याच्या छळाच्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख नव्हता.

Unnatural sex with wife is not rape
Chikkodi Lok Sabha : 370 कलम हटवून मोदींनी देशातील दहशतवाद संपविला, 70 वर्षांत काँग्रेसनं काय केलं? अमित शहांचा सवाल

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने आपल्या महत्त्वपूर्ण आदेशात म्हटले आहे की, पतीने 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या त्याच्या पत्नीबरोबर शरीरसंबंध निर्माण केल्यास किंवा लैंगिक कृत्य केल्यास त्याला बलात्कार म्हणू शकत नाही.  भारतीय दंड विधानातील कलम 376 ब हे अपवाद आहे. यामध्ये कायदेशीर पद्धतीने विभक्त झाल्यानंतर किंवा वेगळे राहत असलेल्या पत्नीबरोबर लैंगिक कृत्य केलं तर त्यास बलात्कार म्हणता येईल.

न्यायमूर्ती अहलूवालिया म्हणाले, "महिलेच्या गुदद्वारात पुरुषाचं लिंग घुसवणे हे कृत्य बलात्काराच्या व्याख्येत समाविष्ट आहे. मात्र हे कृत्य पतीनेच त्याच्या पत्नीबरोबर केलं असेल तर याला बलात्कार म्हणता येणार नाही. अशा स्थितीत पत्नीच्या संमतीला महत्त्व नसतं."

विशेष बाब म्हणजे भारतीय दंड विधानातील कलम 375 नुसार, बलात्कारामध्ये सर्व प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचा समावेश होतो ज्यामध्ये महिलेच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध असतात. मात्र कलम 375 च्या अपवाद 2 नुसार, 15 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आणि पतीबरोबर राहत असलेल्या पत्नीशी पतीने संभोग केला असेल तर ती महिला पतीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करू शकत नाही.

Unnatural sex with wife is not rape
Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.