आणखी चार आमदार यूपी भाजप सोडतील; शरद पवार यांचं सुतोवाच

NCP president Sharad Pawar
NCP president Sharad Pawar esakal
Updated on

लखनऊ : उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये (Uttar Pradesh) निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. यूपीमध्ये निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला घरघर लागली आहे. आतापर्यंत योगी सरकारमधील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला असून आणखी काही आमदार पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. याबाबतचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी याआधी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, यूपीमध्ये 13 आमदार भाजपला रामराम ठोकणार आहेत. त्यांचं हे विधान एकीकडे खरं ठरलेलं असतानाच आता त्यांनी आणखी एक विधान केलं आहे. त्यांनी आणखी चार भाजप आमदार पक्ष सोडणार असल्याचं सुतोवाच केलंय.

NCP president Sharad Pawar
मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय की, आता एकही दिवस असा नाहीये जात ज्या दिवशी भाजपचा एखादा नेता पक्ष सोडत नाहीये. उदाहरणासाठी यूपीचं घ्या. त्याठिकाणी 13 आमदार दुसऱ्या पक्षास सामील होण्यासाठी भाजपची साथ सोडत आहेत. मला असं समजलंय की, भाजपचे आणखी चार आमदार आजच पक्ष सोडत आहेत.

NCP president Sharad Pawar
नितेश राणेंना अटकेपासून दिलासा कायम, सोमवारी निकाल

दरम्यान, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पहिला झटका देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एका जुन्या खटल्यामध्ये त्यांना हे वारंट बजावण्यात आलंय.

या वारंटनंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपलं मत मांडलंय. त्यांनी म्हटलंय की, माझ्यावर आठ वर्षे जुन्या खटल्यासंदर्भात एक अजामीनपात्र वारंट दाखल करण्यात आलंय. यूपी राज्य सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरचा हा फक्त दुसरा दिवस आहे. जरी माझ्याविरोधात असे डझनभर खटले दाखल केले तरी माझं धैर्य खचणार नाहीये. त्यांनी जितकं मला संकटात ढकलायचा प्रयत्न करतील, तितकं मी स्ट्राँग होत जाणार आहे आणि त्यांना पराभूत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.