नवी दिल्ली : निती आयोगाने आरोग्य क्षेत्रातील कामगिरीच्या मुल्यमापनातून राज्यांची क्रमवारी ठरविणारा आरोग्य निर्देशांक जारी केला. यात २०१९-२० वर्षातील कामगिरीच्या आधारे तयार केलेल्या आरोग्य निर्देशांकामध्ये १९ बड्या राज्यांमध्ये भाजपशासित उत्तर प्रदेश सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. केरळ प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा क्रमांक या निर्देशांकामध्ये पाचवा आहे. तर तमिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Policy Commission released the Health Index)
नीती आयोगातर्फे दरवर्षी हेल्थ इंडेक्स म्हणजेच आरोग्य निर्देशांक जाहीर केला जातो. यामध्ये मागील वर्षाप्रमाणे (२०१८-१९) प्रमाणे निर्देशांकामध्येही महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक राहिला असला तरी कामगिरीमध्ये गुणात्मक सुधारणा झाली. महाराष्ट्राचे मागील वर्षीचे गुण ६५.५४ होते. तर २०१९-२० च्या निर्देशांकामध्ये राज्याचे गुण ६९.१४ असे वाढले आहेत. तर मागील वर्षीच्या क्रमवारीमध्ये ६८.८८ गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्रप्रदेशची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. निर्देशांकाच्या क्रमवारीमध्ये मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश अंतिम स्थानी असले तरी या राज्याला सर्वाधिक वाढीव गुण मिळाले आहेत.(Maharashtra's score last year was 65.54)
निरोगी राज्ये, प्रगतशील भारत
आरोग्य क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे राज्यांची क्रमवारी ठरविणारा ‘निरोगी राज्ये, प्रगतशील भारत’ या शीर्षकाखालील हा अहवाल नीती आयोगाने आरोग्य मंत्रालय आणि जागतिक बॅंकेच्या मदतीने तयार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.