पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारताविरुद्ध कट रचण्यात कायमच अग्रेसर आहे. अशातच रशियातील भारतीय दूतावासात तैनात असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भारतीय कर्मचारी असूनही पाकिस्तानी एजन्सी इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) साठी काम करत होता. त्याला मेरठमधून अटक करण्यात आली असून, यूपी एटीएसने ही कारवाई केली आहे.
सत्येंद्र सिवाल असे या आयएसआय एजंटचे नाव असून तो मॉस्कोमधील भारतीय दूतावासात भारतीय सुरक्षा सहाय्यक (IBSA) म्हणून तैनात होता. सत्येंद्र भारतीय लष्कर आणि आयएसआयशी संबंधित महत्त्वाची माहिती देत होता. सत्येंद्र 2021 पासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासात तैनात असल्याचे सांगितले जात आहे.
यूपी एटीएसला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हँडलर परराष्ट्र मंत्रालयाच्या (भारत सरकार) कर्मचाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून आणि हनी ट्रॅपिंग करत असल्याची माहिती मिळाली होती. यूपी एटीएसने या इनपुटची चौकशी केली असता, सत्येंद्र सिवाल यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला दिलेल्या माहितीच्या बदल्यात पैसेही पाठवण्यात आल्याचे आढळून आले आहे.
भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एजंट्सच्या माध्यमातून गोळा केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरचे रहिवासी सत्येंद्र सिवाल हे परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस (मल्टी-टास्किंग, स्टाफ) या पदावर नियुक्त आहेत. तो सध्या रशियाची राजधानी मॉस्को येथे असलेल्या भारतीय दूतावासात कार्यरत होता. अटकेनंतर सत्येंद्रकडून दोन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.