Ram Temple: राम मंदिराचे काम संथ गतीने; मजुरांनी सोडलं काम, परत येण्यास नकार; कारण काय?

Ram temple Laborers quit: आतापर्यंत राम मंदिराच्या कार्यात गुंतलेल्या ८ ते ९ हजार मजुरांपैकी अर्ध्या मजुरांनी काम सोडलं आहे, असं ते म्हणाले आहेत.
Ram Temple
Ram Temple
Updated on

नवी दिल्ली- राम मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. गेल्या तीन महिन्यापासून मंदिराचे निर्माण काम संथ गतीने होत आहे. आतापर्यंत राम मंदिराच्या कार्यात गुंतलेल्या ८ ते ९ हजार मजुरांपैकी अर्ध्या मजुरांनी काम सोडलं आहे, असं ते म्हणाले आहेत.

माहितीनुसार, राम मंदिर निर्माणाचे कार्य हे लार्सेन अँड टूब्रो कंपनीकडे आहे. त्यांना २०२४ च्या शेवटपर्यंत मंदिर पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. पण, मजूर कमी पडत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. राम मंदिराच्या वेगवेगळ्या कामासाठी जवळपास १०० कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या कंत्राटदारांकडून राम मंदिराच्या निर्माणासाठी मजूर नेमण्यात आले आहेत.

Ram Temple
Ayodhya Ram Mandir: पैसे देऊन राम मंदिरात कोणतेही व्हीआयपी दर्शन नाही, ट्रस्टचे स्पष्टीकरण...

नृपेंद्र मिश्रा यांनी लार्सेन अँड टूब्रो कंपनीसोबत आतापर्यंत दोनवेळा बैठक घेतली आहे. त्यांना मंजुरांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या राम मंदिराचे काम दोन महिने मागे आहे. मंदिरांचे शिखर तयार करायचे आहे. हेच काम सर्वात कठीण आहे. त्यासाठी आधी दुसऱ्या मजल्यावर घुमटाचे काम पू्र्ण करावे लागणार आहे. काम असंच सुरु राहिलं तर काम पू्र्ण व्हायला दोन महिने लागतील.

Ram Temple
Ram Mandir : पावसात अयोध्येच्या राम मंदिराला लागली गळती ; 'ज्यावर मतं मागितलीत ते राम मंदिरही धड बांधलं नाही' किरण मानेंचा संताप

कशामुळे मजूर मिळत नाहीत?

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष मिश्रा यांनी सांगितलं की, सध्या २०० ते २५० मजूर कमी पडत आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणे अवघड आहे. सध्याच्या पावसाच्या वातावरणामुळे अनेक मजुरांनी काम सोडून दिलं आहे. हे मजूर परत आणण्यासाठी संबंधित कंपनीला अवघड जात आहे. लाईव्ह हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार एका कंत्राटदाराने सांगितलं की, काम सोडून गेलेले मजूर परत येण्यास तयार होत नाहियेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.