UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात पाच दिवसांत १५ सभा घेतल्या. योगी सरकारने ३० मंत्र्यांच्या ‘टीम-३०’ लाही मैदानात उतरविले होते.
yogi adityanath
yogi adityanathesakal
Updated on

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए’ला ८० पैकी ३६ व भाजपला ३३ जागा मिळाल्याने बॅकफूटवर गेलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोटनिवडणुकीतील विजयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील नऊपैकी सात विधानसभा मतदारसंघांत भाजपने विजय मिळविला. समाजवादी पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून भाजप व आदित्यनाथ सावरू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.