मोदी आणि योगींमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला धक्का

मोदी आणि योगींमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला धक्का
Updated on
Summary

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशातील कॅबिनेट विस्तार आणि राज्यातील नेतृत्व बदलाची चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजप नेते राधा मोहन सिंह यांनी सर्व चर्चांना फेटाळून लावलं आहे

नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशातील कॅबिनेट विस्तार आणि राज्यातील नेतृत्व बदलाची चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजप नेते राधा मोहन सिंह यांनी सर्व चर्चांना फेटाळून लावलं आहे. यूपी सरकारच्या कॅबिनेटमध्ये काही जागा रिक्त असल्या तरी सध्यातरी विस्तार केला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इच्छेनुसार या जागा भरल्या जातील, असं ते म्हणाले आहेत. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (up Cabinet reshuffle no rift between narendra Modi and yogi Adityanath Radha Mohan Singh)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु होती. यावरही राधा मोहन सिंह यांनी भाष्य केलं असून पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगी आदित्यनाथ योग्य व्यक्ती असल्याचं ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सिंह यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची राजभवनमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे कॅबिनेट विस्ताराच्या चर्चांना उत आला होता. पण, सिंह यांनी ही एक केवळ औपचारिक भेट असल्याचं म्हटलंय. तसेच पदावर नियुक्त झाल्यापासून मी कधीही त्यांची भेट घेतली नव्हती, असं ते म्हणाले.

मोदी आणि योगींमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला धक्का
पाकिस्तानमध्ये दोन रेल्वेंची धडक; 30 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील भाजपचे संघटन सर्वात मजबूत आहे. तसेच उत्तर प्रदेशचे सरकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे विरोधकांकडून जाणूनबुजून अफवा पसरवल्या जात आहेत, असंही राधा मोहन सिंह म्हणाले. सिंह यांनी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांची भेट घेतली होती. त्यांनी लोकसभा सभापती हृदय नारायण दिक्षीत यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे चर्चा होणं साहजिकच होतं, पण ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सिंह म्हणाले होते. pjc

मोदी आणि योगींमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला धक्का
सरकार लसीसाठी नव्हे ‘ब्लू टिक’साठी भांडतेय - राहुल गांधी

कॅबिटनेमध्ये सध्या काही जागा रिक्त आहेत. योगी आदित्यनाथ यासंबंधी योग्य वेळी निर्णय घेतील. राज्यात संघटना आणि सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सध्या कसलाही कॅबिनेट विस्तार होणार नाही. सर्वांचं लक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आहे. वृत्तपत्रामध्ये पाहिलात तर तुम्हाला कळून येईल की, वाढदिवसा दिवशी योगी आदित्यनाथ यांना सर्वप्रथम शुभेच्छा देणारे पंतप्रधान मोदी होते, असं सिंह म्हणाले. दरम्यान, योगी यांच्या नेतृत्व बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी, त्यांच्या राज्यातील वर्चस्वाला धक्का बसल्याचं स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.