नवी दिल्ली- उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी (निवृत्त) अनूप चंद्र पांडेय यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. अनूप चंद्र 1964 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांना 37 वर्ष भारतीय प्रशासकीय सेवेतील अनुभव आहे. माजी आयएएस अधिकारी अनूप चंद्र पांडेय यांना मंगळवारी नवा निवडणूक आयुक्त म्हणून घोषित करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (UP cadre IAS officer Anup Chandra Pandey appointed Election Commissioner)
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोडा यांचा कार्यकाळ 12 एप्रिलला पूर्ण झाला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. कायदा मंत्रालयाच्या विभागाने सांगितलं की, राष्ट्रपतींनी 1984 बॅचचे सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी पांडेय यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केलं आहे. सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर राजीव कुमार निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयोगात तीन सदस्य असतात. येत्या काळात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मनीपूर आणि उत्तराखंडच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टीकोणातून पांडेय यांच्या नियुक्तीकडे पाहिलं जातंय.
2018 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव असलेले अनूप चंद्र 2019 च्या ऑगस्टपर्यंत आपल्या पदावर होते. ते यादरम्यान एनजीटीमध्ये देखरेख समितीचे सदस्य होते. अनूप चंद्र यांनी योगी सरकारमध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि एमबीएची पदवी घेतली. तसेच त्यांच्याकजे प्राचिन इतिहासातील डॉक्टरेट आहे. त्यांनी 37 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केलंय. पांडेय यांचा निवडणूक आयुक्त म्हणून 3 वर्षांचा कार्यकाळ असणार आहे. ते फेब्रुवारी 2024 मध्ये निवृत्त होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.