UP Police Exam Cancelled : कष्ट वाया जाणार नाहीत! पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा अखेर रद्द; तरूणांचा एकच जल्लोष

Yogi Adityanath announces cancellation of UP Police exams 2023 : छपरीक्षेदरम्यान पेपर फुटीचे प्रकार उघड झाल्याने विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती
UP Police Exam Cancelled
UP Police Exam Cancelled
Updated on

UP Police Exam Cancelled Latest News : उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १७ आणि १८ फेब्रुवारील रोजी झालेली पोलीस भरतीची परिक्षा रद्द केली आहे. इतकेच नाही तर सहा महिन्याच्या आत ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश देखील दिले आहेत.

परीक्षेदरम्यान पेपर फुटीचे प्रकार उघड झाल्याने विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाकडून ११ फेब्रुवारी रोजी आयोजित समिक्षा अधिकारी/सहायक समीक्षा अधिकारी (प्रारंभिक) परीक्षा - २०१३ संबंधी तक्रारीची चौकशी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी हा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर त्यांनी तरुणांच्या कष्टाशी खेळ करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असेही आदित्यनाथ म्हणाले.

UP Police Exam Cancelled
बुरखा तोंडावरुन हटव, तुझा सुंदर चेहरा..; मुस्लीम महिलेविषयी असभ्य टिप्पणी करणाऱ्या पोलिसाचे निलंबन

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेसंबंधी मिळालेली माहिती आणि तपासाच्या आधारावर ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच भारती बोर्डाला निर्देश देण्यात आले आहेत की, या परीक्षेदरम्यान निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जावा तसेच याचा तपास एसटीएफच्या माध्यामातून करण्यात यावा. तसेच दोषी आढळलेल्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, सहा महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. तसेच उत्तर प्रदेश परिवहन निगम सेवा परीक्षा उमेदवारांना त्यांचे शिल्क परत करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

UP Police Exam Cancelled
Criminal Laws Notification: तीन नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून देशभरात होणार लागू; सरकारनं काढलं नोटिफिकेशन

उत्तर प्रदेशात पोलीस शिपाई पदाच्या ६० हजार जागांसाठी राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये तब्बल ४८ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षेदरम्यान २४४ सॉल्व्हर आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्यांमधील अनेक लोक सापडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आंदोलने केली होती.

दरम्यान सीएम योगी आदित्यनाथ यांनी यूपी पोलीस कॉन्स्टेबल सिव्हिल पोलीस परीक्षा २०२३ रद्द करण्याची आणि पुढील ६ महिन्यांत पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश दिल्याने लखनौमधील उमेदवारांनी एकत्र येत जल्लोष केला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()