''जनतेचा पैसा आधी कब्रिस्तानवर खर्च व्हायचा, आता मंदिरांवर होतो''

 CM Yogi Adityanath
CM Yogi Adityanathsakal
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशातील (UP Government) तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारवर धार्मिक भेदभाव केल्याचा आरोप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कब्रिस्तान आणि हिंदू स्मशानभूमीची तुलना केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ (CM Yogi Adityanath) यांनी बुधवारी पुन्हा एकदा याबाबत मुद्दा उपस्थित केला. आम्ही राज्यातील निधी हा मंदिरांचं सुशोभीकरण करण्यासाठी वापरला. मात्र, गेल्या सरकारने याच निधीमधून फक्त कब्ररीस्तानाभोवती भिंती बांधण्याचे काम केले, असं योगी म्हणाले. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिपोत्सव पार पडला. यावेळी योगी बोलत होते.

 CM Yogi Adityanath
योगी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; 77 कोटींचं पॅकेज जाहीर

''उत्तर प्रदेशामध्ये आता कुठं बदल दिसायला लागला आहे. गेल्या सरकारने फक्त कब्रिस्तानसाठी काम केले. मात्र, आमचं सरकार मंदिर उभारणी आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी काम करत आहे. ज्यांना कब्रिस्तानाबद्दल आत्मीयता वाटते त्यांनी राज्याचा पैसा तिथे उधळला. मात्र, संस्कृती आणि धर्माबद्दल आस्था वाटणारे लोक मंदिरासाठी खर्च करतात, असं म्हणत योगींनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला.

''अयोध्येतील राम मंदिराच्या विकासाव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारांनी उत्तर प्रदेशातील ५०० हून अधिक मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर काम हाती घेतले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या विकासाच्या मार्गात कोणतेही अडथळे नाहीत. जगातील कोणतीही शक्ती त्याचे बांधकाम रोखू शकत नाही'', असे सांगत त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनीही केलं होतं वक्तव्य -

पंतप्रधान मोदी यांनी कब्रिस्तान आणि हिंदू स्मशानभूमीबद्दल पहिल्यांदा वक्तव्य केलं होतं. फेब्रुवारी २०१७ मध्ये फतेहपूर येथे मोदींची सभा होती. ''गावाला कब्रिस्तान मिळाले तर हिंदू स्मशानभूमीही मिळायला हवी. रमजानमध्ये वीज असेल तर दिवाळीतही वीज असावी. होळीच्या वेळी वीज असेल तर ईदच्या वेळीही वीज असावी. कोणताही भेदभाव नसावा.'' असं मोदी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.