Amethi : राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार; UP काँग्रेस अध्यक्षांची घोषणा

Smriti Irani vs Rahul Gandhi
Smriti Irani vs Rahul Gandhiesakal
Updated on

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा परत मिळाल्यापासून काँग्रेस पक्षात चैतन्या निर्माण झालं आहे. त्यातच आता राहुल गांधी यांच्या आगामी काळात लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीच्या मतदार संघाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातचआता राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या जुन्या अमेठी मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. याबाबत 'आज तक'ने वृत्त दिलं आहे.

Smriti Irani vs Rahul Gandhi
Bacchu Kadu: 'अजून लग्न ठरायचं आहे, मंगलकार्यालयाचं नाव कसं सांगू'; बच्चू कडू असं का म्हणाले?

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अजय राय पहिल्यांदाच वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विमानतळावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी अजय राय यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. यावेळी अजय राय यांनी अमेठीबाबत मोठी घोषणा केली.

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार? यावर अजय राय म्हणाले की, होय, नक्कीच लढवणार असून अमेठीचे लोक इथे आले आहेत. प्रियंका गांधी जिथे म्हणतील तिथे आम्ही राहुल गांधी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचवेळी राय यांनी स्मृती इराणींवर हल्लाबोल करताना म्हटलं, इराणी म्हणाल्या होत्या की, कमळाचे बटण दाबा, तुम्हाला 13 रुपये किलोने साखर मिळेल. मात्र ती अजुनही मिळाली नाही.

Smriti Irani vs Rahul Gandhi
State Elections:महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार परराज्यात प्रवासाला, केंद्राकडून घेतली जाणार शाळा

बेरोजगारी, महागाई आणि लोकांना घाबरवून आपल्यासोबत घेणे या राज्यातील सर्वात मोठ्या समस्या आहेत. ते लोकांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आपल्या बाजुने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजय राय म्हणाले. ते पुढं म्हणाले की, राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला तो संदेश काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात पोहोचवतील.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, अमेठी मतदार संघातून राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. मात्र राहुल गांधी यांनी वायनाड मतदार संघातून देखील उमेदवारी अर्ज दाखल केली होता. तिथे मोठा विजय झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()